Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

आज (4 नोव्हेंबर) दिवशी इंडिगो एअरलाईन्सची (Indigo Airlines) सेवा भारतात सर्वत्र ठप्प झाली आहे. त्यामुळे देशभरातील अनेक महत्त्वाच्या विमानतळांवर प्रवाशांची आज गैरसोय होण्याची शक्यता आहे. इंडिगोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लवकरात लवकर विमानसेवा आणि उड्डाणाचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान आजपासून मुंबई विमानतळावर रनवेच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्याने पुढील काही महिने विमान सेवेवर त्याचा परिणाम होणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी 4 नोव्हेंबर ते 28 मार्च पर्यंत बंद; विमान तिकीट महागण्याची शक्यता.

इंडिगोचं बाबतचं ट्वीट

इंडिगो विमानसेवेच्या तांत्रिक गोंधळामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत. इंडिगोने याबाबत दिलगिरी व्यक्त करत दिवसभरातील उड्डाणांसाठी इंडिगोच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. तसेच विमानतळावर कस्टमर केअर सेवा कक्षावर तुमच्या विमानाच्या उड्डाणाच्या स्थितीबाबत अपडेट्स जाणून घ्या असं सांगण्यात आलं आहे.