Indigo कंपनीची खास Anniversary ऑफर; फक्त 915 रुपयांमध्ये करू शकता विमान प्रवास, जाणून घ्या कधी करू शकता बुकिंग
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

जर तुम्हीही विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आपल्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त इंडिगो (IndiGo) कंपनी एक विशेष ऑफर घेऊन आली आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ आजपासून म्हणजेच 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट पर्यंत घेऊ शकता. कंपनीने इंडस्ट्रीमध्ये आपली 15 वर्षे पूर्ण केली आहेत, त्याच आनंदाप्रीत्यर्थ कंपनीने हा सेल सुरू केला आहे. इंडिगोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, या ऑफर अंतर्गत तुम्ही फक्त 915 रुपयांमध्ये विमान प्रवास करू शकता. प्रवासी 1 सप्टेंबर 2021 ते 26 मार्च 2022 दरम्यान देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरमध्ये ग्राहकांना एचएसबीसी क्रेडिट कार्डवर अतिरिक्त सूट मिळणार आहे. ग्राहकांना अतिरिक्त 5 टक्के कॅश बॅक ऑफरही मिळेल, जी किमान 3000 रुपयांच्या व्यवहारावर उपलब्ध असेल आणि हा कॅशबॅक 750 रुपयांपर्यंत असेल.

या ऑफरमुळे फास्ट फॉरवर्ड 6E Flex, 6E Bagport सारख्या सुविधा फक्त 315 रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटवर उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त, 315 रुपयांच्या अतिरिक्त देयकावर कार रेंटल सुविधा देखील उपलब्ध असेल. (हेही वाचा: RBI Alert: जुन्या नोटा, नाणी यांबाबत आरबीआयचा इशारा, व्यवहार करताना सावधान)

प्रवासी आगरतल, आग्रा, अहमदाबाद, अमृतसर, औरंगाबाद, बागडोरा, बंगळुरू, बेळगाव, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, देहरादून, दिल्ली, दिब्रुगढ, दिमापूर, गया, गोवा, गोरखपूर, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाल, इंदौर, जयपूर, जम्मू, जोधपूर, कन्नूर, कोची, कोल्हापूर, कोलकाता, कोझीकोडा, लेह, लखनौ, मदुराई, मंगलोर, मुंबई, म्हैसूर, नागपूर, पाटणा, पोर्ट ब्लेअर, प्रयागराज, पुणे, रायपूर, राजामुंद्री, रांची, शिलाँग, शिर्डी, सिलचर, श्रीनगर, सुरत, त्रिचुरापल्ली, तिरुपती, त्रिवेंद्रम, उदयपूर, वडोदरा, वाराणसी, विजयवाडा, विशाखापट्टणम येथून तिकिटे बुक करू शकतात.