Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. भारतातही कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळेच लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. दरम्यान, भारतीय बनावटीच्या लसी संबंधित एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेक (ICMR-Bharat Biotech) यांनी एकत्रितपणे विकसित केलेल्या Covaxin या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स भारतात सुरु होत्या. लसीच्या सकारात्मक परिणामांमुळे या लसीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, अशी माहिती ICMR ने दिली आहे.

ICMR-Bharat Biotech ने एकत्रितपणे कोविड-19 विरुद्ध बनवलेल्या कोवॅक्सिन लसीने यशस्वी टप्पा गाठला आहे. भारतामध्ये झालेल्या ट्रायल्सच्या डेटावरुन ही लस अगदी सुरक्षित असून लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. Covaxin च्या फेज 1 आणि फेज 2 च्या ट्रायल्सचे रिझल्ट्स खूप चांगले आल्यामुळे भारतात फेज 3 चे क्लिनिकल ट्रायल्स सुरु झाले आहे. हे ट्रायल्स भारतातील 22 वेगवेगळ्या साईट्सवर चालू आहेत. या भारतीय लसीने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (कोरोना व्हायरस New Strain धोक्याच्या पार्श्वभूमीवर युरोप, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्वेकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने जारी केली नियमावली)

ANI Tweet:

दरम्यान,  ब्रिटेन मध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने पुन्हा एकदा जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, हा धोका टाळण्यासाठी सर्वच देशातून महत्त्वपूर्ण पाऊलं उचलण्यात येत आहेत. भारत सरकारने देखील  ब्रिटेन वरुन येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमान उड्डाणांवर 31 डिसेंबर पर्यंत बंदी घातली आहे.

24 डिसेंबर सकाळच्या अपडेटनुसार, भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 1,01,23,778 वर पोहचला आहे. त्यापैकी 2,83,849 सक्रीय रुग्ण असून 96,93,173 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 1,46,756 मृतांची नोंद झाली आहे.