Passenger being screened at airport (Photo Credits: PTI)

राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याने पुन्हा एकदा त्याचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने युरोप (Europe), दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि मध्य पूर्वेकडील (Middle East) देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली जारी केली आहे. त्याचबरोबर त्या देशातून येणाऱ्या सर्व विमानांसाठी देखील हे नियम लागू असतील. यानुसार विमानतळावरील प्रवाशांची RT-PCR टेस्ट करण्यात येणार नाही. तसंच युके (UK) वरुन येणाऱ्या asymptomatic प्रवाशांना आठवड्याभरासाठी क्वारंटाईन होणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, हे नियम त्वरीत लागू केले जातील.

युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य-पूर्वेकडून येणाऱ्या asymptomatic प्रवाशांची RT-PCR टेस्ट करण्यात येणार नाही. त्यांना क्वारंटाईन सुविधा पुरवण्यात येईल. मात्र त्यासाठी शुल्क आकारले जातील. पाचव्या किंवा सातव्या दिवशी हॉटेलमध्ये प्रवाशाची RTPCR टेस्ट करण्यात येईल. या टेस्टचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आल्यास त्यांना institutional quarantine मधून डिस्चार्ज देवून 7 दिवस होम क्वारंटाईन होण्यास सांगितले जाईल. मात्र रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले परंतु रुग्ण asymptomatic असेल तर त्या व्यक्तीला 14 दिवस त्याच हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येईल. (Night Curfew in Mumbai: मुंबई पोलीस राजी; नाईट कर्फ्यू काळात नागरिकांना दुचाकी, चारचाकीने प्रवास करण्यास सशर्थ परवानगी)

ANI Tweets:

युके मध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आला आहे. हा मूळ कोविड-19 पेक्षा अधिक झपाट्याने पसरतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने SOP जारी केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने देखील 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटेन वरुन येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे.