कोरोना व्हायरस सारख्या भीषण विषाणूशी लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. जगभरात या कोरोनाने अक्षरश: मृत्यूचे तांडव सुरु केले असून याविरुद्ध लढण्यासाठी सर्व देश एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून देशाला संबोधित करत देशवासियांच्या एकजुटीचे कौतुक केले. कोरोना सारख्या भीषण संकटाशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून सर्व शासकीय, वैद्यकिय यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला देशातून हद्दपार करणे हा एकच आपल्या सर्वांचा उद्देश आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
तसेच भारत सरकारने सुरु केलेल्या covidwarriors.gov.in या संकेतस्थळावरही लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी सुद्धा कोरोनाविरुद्ध लढा देत असून आपण जिंकणारच असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जनतेची मिळालेली साथ ही कौतुकास्पद असल्याचे सांगितले आहे. Coronavirus in India: भारतात मागील 24 तासांत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ! देशातील कोरोना बाधितांचा आकडा 26000 च्या पार
तसेच भारताने इतर देशांना औषधांचा पुरवठा केला असून चांगले संबंध प्रस्थापित केले आहे. तसेच देशाचे भविष्य समजल्या जाणा-या तरुण पिढीने पुढे या आजाराविरुद्ध लढण्यासाठी आपले आधुनिक विचार आमच्यापर्यंत पोहोचवावे असेही ते म्हणाले. लोकांनी योग्य ती काळजी घ्या, मास्कचा वापर करा असा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मागील 24 तासांत भारतात तब्बल कोरोनाचे 1990 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही वाढ मोठी असून यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26,496 इतकी झाली आहे. त्यापैकी 19868 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 5804 रुग्ण कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत एकूण 824 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.