Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटाने भारत देशात दाहक स्वरुप दाखवायला सुरुवात केली आहे. दिवसागणित कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविड 19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा देखील हळूहळू वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण असताना कोरोना रुग्णांची संख्या आजच्या दिवशीही वाढलेली पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत तब्बल कोरोनाचे 1990 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही वाढ मोठी असून यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26,496 इतकी झाली आहे. त्यापैकी 19868 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 5804 रुग्ण कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत एकूण 824 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रात एकूण 7628 कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1000 च्या वर आहे. (दिवसभरातील लेटेस्ट अपडेट्स, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन तब्बल 19 दिवसांनी वाढवण्यात आला. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' मधून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसचे संकट, लॉकडाऊन याबद्दल पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे साऱ्या जनतेचे लक्ष लागले आहे.