Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
14 minutes ago
Live

Coronavirus: कोरोनामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बद्रुद्दीन शेख यांचे निधन; 26 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Apr 26, 2020 11:34 PM IST
A+
A-
26 Apr, 23:33 (IST)

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते बद्रुद्दीन शेख यांचे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. बद्रुद्दीन शेख यांच्या निधानाने राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

26 Apr, 23:01 (IST)

लॉकडाउन दरम्यान स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्याची आवश्यकता नसून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेतली जाईल असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्टेटस रिपोर्टमध्ये सांगितले.

26 Apr, 22:56 (IST)

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील गुडर भागात भारतीय सैन्य दलाचे जवान, केंद्रीय राखीव पोलिस दल, पोलिस आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

26 Apr, 22:45 (IST)

दिल्लीमध्ये आज दिवसभरात 293 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यासह राज्यात कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा आकडा 2918 वर पोहचला असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे.

26 Apr, 21:49 (IST)

चंदीगढ येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिलेला आणि तिच्या 11 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण होती. या दोघांनीही कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

26 Apr, 21:04 (IST)

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. यामुळे मुंबई (Mumbai) शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 204 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज एकूण 324 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 5 हजार 194 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

26 Apr, 20:42 (IST)

धारावीत आज कोरोनाचे नवे 34 रुग्ण आढळून आल्याने आकडा 275 वर पोहचला आहे. तर 14 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

26 Apr, 20:37 (IST)

मध्य प्रदेशात कोरोनाबाधितांचा आकडा 2090 वर पोहचला तर 103 जणांचा मृत्यू  झाला आहे.

26 Apr, 20:30 (IST)

अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात एफआयआर मूळ नागपूरात दाखल करण्यात आले होत. मात्र सुप्रीम कोर्टाने आता हे प्रकरण मुंबईत हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे उद्या सकाळी 9 वाजता गोस्वामी यांना मुंबईत पोलिसांसमोर हजर रहावे लागणार आहे.

26 Apr, 20:02 (IST)

हरियाणा येथे एकूण 296 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 94 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Load More

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतासह संपूर्ण जगाच्या अजेंड्यावर सध्या एकच विषय प्रभावीपणे आहे. तो म्हणजे कोरोना व्हायरस. कोविड 19 असे अधिकृत नाव असलेला हा व्हायरस जगभरातील अपवाद वगळता सर्वच देशांसाठी काळ ठरला आहे. या व्हायरसने जगभरात आजपर्यंत लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. लाखो लोकांना आपल्या संक्रमनाची शिकार केले आहे. त्यामुळे हा व्हायरस, त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरात केले जाणारे उपाय, उपाययोजना, त्याबाबतच्या बातम्या, ठळक घटना, घडामोडी या सर्व गोष्टी जाणून घेण्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. ही उत्सुकता आम्ही लेटेस्टली मराठीच्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पूर्ण करत असतो. जी आजही पूर्ण होऊ शकेल.

कोरोना व्हायरस हा जगभरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण करतो. यात या व्हायरसची लागण झालेला रुग्ण दगावूही शकतो. पण, हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही. तर, जागतीक अर्थव्यवस्था जगभरातील अनेक देशांची राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक अर्थव्यवस्थाही या विषाणूने धोक्यात आणली आहे. या विषाणूमुळे घसरलेलेल अर्थव्यवस्थेचे चाक रुळावर आणणे ही त्या त्या ठिकाणच्या सरकारांसमोरील महत्त्वाची आणि मोठी आव्हाने आहेत.

कोरोना व्हायरस विषाणूने केवळ अर्थव्यवस्थेतच धुमाकूळ घातला आहे असे नाही. तर, तुम्ही गरीब राष्ट्र असा किंवा जागतिक महासत्ता असा. नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास तुम्ही अकार्यक्षम ठरला. निसर्गावर चुकीच्या पद्धतीने प्रहार करत राहिलात. निसर्गचक्र उलथवून टाकू पाहात असाल तर खबरदार. तुम्हाला ते शक्य होणार नाही, असेच काहीसे या व्हायरसने दाखवून दिले आहे. आज ना उद्या या व्हायरसवर उपचार निघेलच. परंतू, तोपर्यंत जगाने फार मोठी किंमत मोजलेली असेल. या सर्व घटना घडामोडींबाबतचा तपशिल अद्यावतपणे जाणून घ्यायचा असेल तर, लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.


Show Full Article Share Now