Coronavirus Update: भारतात COVID-19 रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ! कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 41 लाख 13 हजार 812 वर
Coronavirus (Photo Credits: Twitter)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) हाहाकार माजविला असून देशात मागील 24 तासांत कोविड-19 रुग्णांच्या संख्येने आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासांत देशात 90,633 नवे रुग्ण आढळले असून कोरोना संक्रमितांची एकूण संख्या (COVID-19 Cases) 41 लाख 13 हजार 812 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, काल (5 सप्टेंबर) दिवसभरात 1065 रुग्ण दगावले असून कोरोनाबाधित मृतांचा एकूण आकडा (COVID-19 Death Cases) 70,626 वर पोहोचला आहे. सद्य घडीला देशात 8 लाख 62 हजार 320 रुग्णांवर उपचार (COVID-19 Active Cases) सुरु आहे.

देशात आतापर्यंत 31,80,866 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात (COVID-19 Recovery Cases) केली आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी वाढत असले तरीही दिवसागणिक वाढत जाणारी रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब असल्याचे दिसून येत आहे. Chemical layer Mask: कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बाजारात येणार केमिकल लेयर असलेला मास्क, काय आहेत याची खास वैशिष्ट्ये

देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकारने कोरोना टेस्टिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. पूर्वी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन (Prescription) शिवाय कोरोनाची चाचणी करता येत नव्हती. परंतु, आता या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. आता कोरोना चाचणी प्रिस्क्रिप्शनशिवायही करता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) कोविड-19 टेस्टिंगची नियमावलीत हे नवे अपडेट लागू केले आहे. या नव्या अपडेटनुसार, ऑन डिमांड टेस्टिंग (On-Demand Testing) करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवासादरम्यानही कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.