Chemical layer Mask: कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बाजारात येणार केमिकल लेयर असलेला मास्क, काय आहेत याची खास वैशिष्ट्ये
मास्क (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिक आपली योग्य ती काळजी घेत आहे. यामध्ये तोंडाला सतत मास्क (Mask)लावणे हे सक्तीचे असून लोकही घराबाहेर पडताना या नियमाचे पालन करताना दिसत आहे. या मध्ये काही नवीनतम गोष्टी आणून जीविका स्वयं सहायता समूहाद्वारे पटनामध्ये आणि वैशाली मध्ये रासायनिक मास्क (Medicated Mask) तयार केला जात आहे. या मास्कसाठी लागणारा रासायनिक लेपसाठी आयआयटी मुंबई (IIT Mumbai) आपले योगदान देत आहेत. यासाठी जीविका असा एक मेडिकेटेड मास्क तयार करत आहे जो सलग 6 महिने न धुता वापरला जाऊ शकतो. आयआयटी मुंबईच्या मदतीने जीविका टीम (Jeevika Team) हा आधुनिक मास्क बनवत आहे.

सद्य स्थितीत वैशालीच्या लालगंज आणि पटनाच्या बिहटामध्ये जीविका भगिनी आयआयटी मुंबईद्वारा हा मास्क तयार करण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहे.  COVID-19 Testing: प्रिस्क्रिप्शन शिवाय On-Demand कोरोना चाचणी करता येणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून टेस्टिंग नियमात मोठा बदल

आतापर्यंत जवळपास 5 लाख मास्क बनवले गेले आहेत. वैशाली जिल्ह्यामध्ये जीविका भगिनींद्वारे 16 ब्लॉकमध्ये या मास्कचे उत्पादनाचे काम होत आहे. यासाठी आम्ही ICDS,स्वास्थ्य विभाग सारख्या सरकारी विभागाला मास्क पुरविली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा मास्क बाजारात यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असेही जीविका महिला म्हणाल्या.

मास्कची वैशिष्ट्ये:

जीविका भगिनी म्हणाल्या हा मास्क मुंबई आयआयटीद्वारा बनवले गेलेल्या रासायनिक द्रव्याने त्याचा लेप बनवला जातो. त्यानंतर हे द्रव्य गरम पाण्यात मिसळून त्यात मास्क चांगला धुतला जातो. त्यानंतर त्याला छान सुकवून त्याची पॅकेजिंग केली जाते. या मास्क मध्ये 2 लेयर आणि 3 प्लेट आहेत. ज्यामुळे हा मास्क 20-25 दिवसानंतर जरी धुतला तरी काही हरकत नाही. यातील रासायनिक द्रव्यामुळे हा विषाणुरोधक बनवला गेला आहे असे बिहटाच्या जीविका महिलांनी सांगितले आहे.

ड्यूराकेटेड तंत्रज्ञानाने बनवलेल्या या मेडिकेटेड मास्क मध्ये तुम्ही 6 महिने धुतले नाही तर विषाणू पसरत नाही. या जीविका भगिनी दर दिवसा 200 ते 600 मास्क बनवतात. ज्याचे 500 ते 1000 रुपये मिळतात.