भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून मागील 24 तासांत देशात कोविड-19 (COVID-19) रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. भारत केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, 62,538 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 20,27,075 वर पोहोचली आहे. तर काल (6 ऑगस्ट) दिवसभरात 886 रुग्ण दगावले असून देशात मृतांची एकूण संख्या 41,585 वर पोहोचली आहे. देशात सद्य घडीला 6,07,384 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 13,78,106 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
भारतात 6 ऑगस्टपर्यंत कोरोना व्हायरसच्या 2,27,24,134 नमुने तपासण्यात आले असून काल दिवसभरात एकूण 5,74,783 चाचण्या घेण्यात आल्या अशी माहिती ICMR ने दिली आहे.
हेदेखील वाचा- Coronavirus: राज्यात आज दिवसभरात कोरोना संक्रमित 11,514 रुग्णांची नोंद, 316 जणांचा मृत्यू
India's #COVID19 case tally crosses 20-lakh mark with highest single-day spike of 62,538 cases
The COVID19 tally rises to 20,27,075 including 6,07,384 active cases, 13,78,106 cured/discharged/migrated & 41,585 deaths: Ministry of Health pic.twitter.com/AaPCaQW27M
— ANI (@ANI) August 7, 2020
देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या (Coronavirus Positive Cases) 1,46,305, उपचार घेऊन रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्या 3,16,375 आणि मृत्यू झालेल्या 16,792 जणांचा समावेश आहे.