Coronavirus: राज्यात आज दिवसभरात कोरोना संक्रमित 11,514 रुग्णांची नोंद, 316 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या (Coronavirus Positive Cases) 1,46,305, उपचार घेऊन रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्या 3,16,375 आणि मृत्यू झालेल्या 16,792 जणांचा समावेश आहे. आज दिवसभरात राज्यात 11,514 कोरोना व्हायरस संक्रमित नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 316 जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मुंबई शहरातील धारावी परिसरतून एक चांगली बातमी येत आहे. धारावी परिसरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसते आहे. गेल्या काही दिवसांमध्ये धारावीत अगदी कोरोना रुग्णांची संख्या अगदीच कमी म्हणजे एकांकी आढळत आहे. आज दिवसभरात धारावीत कोरोना व्हायरस संक्रमित 8 जण आढळले. धारावीतील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2257 इतकी झाली आहे. (हेही वाचा, Coronavirus: जगभरात 1.87 कोटींहून अधिक नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित, मृत्यू 706,000 पार)

दरम्यान, संबंध देशभराचा विचार करता कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 1964537 इतकी झाली आहे. त्यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 595501, उपचार घेऊन बरे झालेल्या 1328337 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 40699 जणांचाही समावेश आहे.