Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 16 लाखांच्या पार; मागील 24 तासांत 55,079 नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव भारतात सातत्याने वाढताना दिसत आहे. दिवसागणित कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असून आता देशातीत कोरोनाग्रस्तांच्या आकडा 16 लाखांच्या पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांच कोरोनाचे 55,079 नवे रुग्ण आढळून आले असून 779 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 16 लाख 38  हजार 871 वर पोहचला आहे. त्यापैकी 5 लाख 45 हजार 318 अॅक्टीव्ह रुग्ण असून 10 लाख 57 हजार 806 रुग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत देशात एकूण 35 हजार 747 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे.

मागील 24 तासांत 55,079 नवे रुग्णांची भर पडली असून ही आतापर्यंतची उच्चांकी वाढ आहे. दरम्यान कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देशात अधिक आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट सुधारत आहे. कोरोना व्हायरसवर ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने टेस्टिंग (Testing), ट्रॅकिंग (Tracking) आणि ट्रिटमेंट (Treatment) या त्रिसुत्रीच्या आधारे देशातील कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणला जात आहे.

ANI Tweet:

काल दिवसभरात भारतात कोविड-19 च्या 6 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर ही क्षमता वाढण्याचे आरोग्य मंत्रालयाचे प्रयत्न आहेत. दिवसाला 10 लाख चाचण्या करण्याची क्षमता निर्माण करणे हे उद्दीष्ट असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.