Representational Image |(Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वेसेवा बंद होती. परंतु, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात रेल्वे बुकींगला 22 मे पासून सुरुवात होणार असून  यासाठी तब्बल 1.7 लाख सर्व्हिस सेंटर्स सज्ज आहेत, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनी काल (21 मे) जाहीर केले. त्यानुसार तिकीट बुकींग आणि तिकीट रद्द करण्यासाठी वेगवेगळ्या पोर्टलवर सुविधा आजपासून सुरु करण्यात आल्या आहेत. ही सुविधा प्रवाशांना पोस्ट ऑफिस आणि यात्री तिकीट सुविधा केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. तसंच IRCTC च्या अधिकृत एजेंट्स, भारतीय रेल्वेचे PRS काऊंटर्स आणि कॉमन सर्व्हीस सेंटर्सवर आजपासून तिकीट बुकींग सुरु होणार आहे. या माध्यमातून तुम्ही तिकीट बुकींग रद्द देखील करु शकता, असे रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक राजेश दत्त बाजपेयी (Rajesh Dutt Bajpai) यांनी सांगितले.

दरम्यान येत्या काळात आणखी ट्रेन्स सुरु करण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकांवरील दुकानांमध्ये पार्सल घेऊन जाण्याची सोय सुरु करण्यात येईल, अशी माहितीही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. 1 जूनपासून विशेष प्रवासी ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी तिकीट बुकींग कालपासून सुरु झाली आहे. (Lockdown 4: संपूर्ण देशात उद्यापासून रेल्वे तिकीट बुकींगला सुरुवात; 1 लाखाहून अधिक सेंटरची सोय- रेल्वेमंत्री पियुष गोयल)

ANI Tweet:

भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव दिसून येत आहे. लाखाच्या घरात पोहचलेला कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक असला तरी त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही आशादायी आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची आगळीवेगळी बांधणी करण्यात आली असून त्यात रेल्वे, विमान सेवा विशेष खबरदारी घेत सुरु करण्यात आल्या आहेत.