Indian Railway: जुन्या तिकिट दरात सुरु होणार 1700 पेक्षा अधिक ट्रेन पण कोरोनाचे नियम पाळणे अनिवार्य
Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

Indian Railway: कोरोनाच्या स्थितीमुळे भारतीय रेल्वेकडून नियमितच्या ट्रेन बंद ठेवण्यात आल्या होता. त्याऐवजी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच आता कोरोना हळूहळू नियंत्रणात येत असल्याने परिस्थितीत ही सुधारणा होऊ लागली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेत असे जाहीर केले की, आता नियमिततच्या ट्रेन सुद्धा सुरु केल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काही दिवसामध्येच 1700 हून अधिक ट्रेन धावणार आहेत.

जाहीर करण्यात आले्ल्या परिपत्रकानुसार, ट्रेनच्या तिकिटांचे दर हे प्री-कोविड वेळी असलेल्या किंमतीप्रमाणे असणार आहेत. म्हणजेच स्पेशल भाडे वसूल केले जात होते ते आता बदलले जाणार आहे. या व्यतिरिक्त जनरल तिकिटाची सुविधा बंद केली जाणार आहे. असे सांगण्यात आले आहे की, आता फक्त रिजर्व आणि वेटिंगच्या तिकिटावर प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. जनरल क्लास असणारी तिकिट कोणालाही दिली जाणार नाही आहे. त्याचसोबत आधीच ट्रेनची तिकिट बुकिंग केलेल्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुक्ल वसूल केले जाणार नाहीत. तसेच पैसे परत दिले जाणार नाही आहेत.(Kannur-Bengaluru Express चे 5 डबे रुळावरुन घसरले, कोणतीही जीवित हानी नाही - पश्चिम रेल्वे)

दरम्यान, नियमित ट्रेन नागरिकांसाठी जरी सुरु केल्या जाणार आहेत तरीही त्यांना कोविडचे नियम पाळणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे, तर 24 मार्च 2020 रोजी ट्रेन सेवा अस्थायी स्वरुपात बंद केली होती. यापूर्वी 166 साली असे पहिल्यांदाच झाले होते की, ट्रेन सुविधा बंद झाली होती. मात्र नंतर माल गाडी आणि श्रमिक ट्रेन चालवण्याची परवानगी दिली गेली. त्यानंतरच स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला गेला. पण आता रेग्युरल ट्रेन लवकरच नागरिकांसाठी धावणार आहेत.