Indian Railway: रेल्वेची सेवा राहणार बंद, तिकिट बुकिंगसह अन्य महत्वाची कामे 'या' वेळेपूर्वीच उरकून घ्या
Representational Image (Photo Credits: PTI)

Indian Railway:  सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अशातच दिवाळी आणि छठ पूजेसाठी लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची सुचना जाहीर करत असे म्हटले की, 23 ऑक्टोंबरच्या रात्री 11.45 वाजल्यापासून ते 24 ऑक्टोंबरच्या सकाळी 5 वाजतेपर्यंत पॅसेंजरला तिकिट बुकिंग करता येणार नाही आहे.(TV पाहणे होणार महाग, जाणून घ्या 1 डिसेंबर पासून लागू होणारे नवे दर)

जर तुम्ही 23-24 ऑक्टोंबर दरम्यान रेल्वे प्रवास करणार असल्यास पॅसेंजर रिजर्व्हेशन सिस्टम (Passenger Reservation System, PRS) चे काम बंद राहणार आहे. हे काम आज रात्री 11.45 वाजल्यापासून ते उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्याचसोबत प्रवाशांना ट्रेन संदर्भातील इन्क्वायरी सुद्धा करता येणार नाही आहे. या व्यतिरिक्त अन्य सेवा सुद्धा प्रभावित होणार आहेत.

पूर्व रेल्वेने म्हटले की, दक्षिण पूर्व रेल्वे, ईस्ट कोस्ट रेल्वे, साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे आणि ईस्ट सेंट्रल रेल्वे मध्ये इंटरनेट बुकिंग, इन्क्वायरी आणि काही सेवा बंद राहणार आहेत. या रेल्वे झोनअंतर्गत येणारी राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, आसामसह पूर्वोत्तर राज्यात रेल्वेच्या ऑनलाईन तिकिट, ऑनलाईन रिटायरिंग रुमची बुकिंग, चौकशी सारखी सेवा सुद्धा बंद राहणार आहेत.(Aadhaar Card Update: तुमच्या आधार कार्डवरील जुना फोटो कसा बदलाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

दरम्यान, रेल्वेचे तिकिट जनरेशन सुद्धा काही काळासाठी बंद केले होते. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात दक्षिण रेल्वेकडून या प्रकारचे नोटिफिकेशन जाहीर केले होते. जाहीरातीत असे म्हटले की, एक नवे डेटा सेंटर स्थापन केले जात आहे. त्यामुळेच नागरिकांना तिकिट बुकिंग करण्यासारखी कामे करण्यास त्रास होणार असल्याचे म्हटले होते.