Aadhaar Card (Photo Credits: PTI)

सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आधार कार्डवर नाव, जन्मतारीख, आधार नंबर, बायोमेट्रिक डेटा आणि फोटो असतो. मात्र आधार कार्डवरील फोटो (Photo) हा खरंच चर्चेचा विषय बनला आहे. कारण आधार कार्ड वरील फोटोतून व्यक्ती ओळखणे मोठे कठीण काम झाले आहे. यावरुन अनेकदा जोक्स आणि मीम्स बनले जातात. तसंच आधार कार्ड अनेक महत्त्वाच्या कामांसाठी लागत असल्याने त्यावरील फोटो चांगला आणि स्पष्ट असणे आवश्यक आहे. त्यामुळेच तुम्हाला जर आधार कार्डवरील फोटो बदलायचा असेल तर तुम्ही हे काम अवघ्या काही स्टेप्समध्ये करु शकता. (Blue-colored Aadhaar Card म्हणजे नेमकं काय? ते कोणाला आणि कसं मिळतं? जाणून घ्या)

फोटो बदलण्यासाठी कार्डधारकांना त्यांच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्र/ आधार सेवा केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. त्यासोबतच UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी खालील स्टेप्सचे फॉलो करा:

# UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करा.

# फॉर्मवरील तपशील भरा.

# जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर फॉर्म सबमिट करा.

# केंद्रातील एक कार्यकारी बायोमेट्रिक पडताळणीद्वारे फॉर्मवरील तपशीलांची पुष्टी करेल.

# आधार नोंदणी केंद्र/ आधार सेवा केंद्रात तुमचा नवीन फोटो घेतला जाईल.

# फोटो बदलण्याच्या सेवेसाठी 25 रुपये + जीएसटी शुल्क भरा.

# विनंती क्रमांक (URN) असलेली एक पावती तुम्हाला दिली जाईल.

# URN चा वापर करून UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर स्टेटस चेक करा.

या स्टेप्सने तुम्ही आधार कार्डवरील फोटो अगदी सहज बदलून नवीन फोटो असलेले आधार कार्ड मिळवू शकता.