Blue-colored Aadhaar Card म्हणजे नेमकं काय? ते कोणाला आणि कसं मिळतं? जाणून घ्या
Aadhaar Card (Photo Credits: PTI)

महत्त्वाच्या कामांसाठी लागणारे महत्त्वाचे ओळपत्र म्हणजे आधार कार्ड. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी करण्यात आलेला 12-अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आता एक महत्त्वपूर्ण ओळख दस्तऐवज बनला आहे. विशेष म्हणजे त्यात आपला demographic आणि  biometric  डेटा समाविष्ट असतो. दरम्यान, आधार कार्डसाठी सर्वजण अप्लाय करु शकतात. अगदी नवजात बालकाचेही आधार कार्ड काढता येते. (Aadhaar Card for Newborn: तुमच्या नवजात बालकाचं आधार कार्ड अवघ्या 2 कागदपत्रांच्या मदतीने uidai.gov.in वर अप्लाय कसं कराल?)

तुम्हाला नावनोंदणी केंद्रावर उपलब्ध असलेला अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रं तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागतील. ओळखपत्र (PoI), पत्त्याचा पुरावा (PoA), संबंधाचा पुरावा (PoR) आणि जन्माचा दाखला (DoB) यांचा समावेश आहे.

ब्लू आधार कार्ड म्हणजे काय?

5 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी असलेले आधार कार्ड म्हणजे ब्लू आधार कार्ड किंवा बाल आधार कार्ड. हे आधार कार्ड मुल 5 वर्षांचे झाल्यानंतर अवैध ठरते. बाल आधार काढण्यासाठी मुलाच्या शाळेचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यात मुलाचे बायोमॅट्रीक्स अपडेट केलेले नसतात. त्यामुळे मुल 5 वर्षाचे होताच ते अपडेट करणे अनिवार्य आहे. अन्यथा कार्ड अवैध ठरते. (Aadhaar Card for Kids: 5 वर्षांखालील मुलांचे आधार कार्ड कसे काढाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

ब्लू आधार कार्ड काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं:

# मुला/मुलीचा जन्मदाखला किंवा शाळेचे ओळखपत्रं.

# आई किंवा वडीलांचे आधार कार्ड.

दरम्यान, लहान मुलांचे आधार कार्ड काढताना फिंगरप्रिंट किंवा आय स्कॅन केले जात नाही. त्यामुळे मुलं 5 वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या 10 ही बोटांचे आणि डोळ्याचे बायोमेट्रीक अपडेट करणे गरजेचे आहे.