आधार नंबर (Aadhaar Number) हा 12 अंकी क्रमांक असतो जो UIDAI कडून एक विशिष्ट व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करून दिला जातो. कोणताही भारतीय व्यक्ती या आधार क्रमांकासाठी अर्ज करू शकतो. त्याला वयाचं, लिंगाचं बंधन नाही. आधार कार्डासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हांला एक 12 अंकी युनिक नंबर दिला जातो. या आधार कार्डासाठी बायोमेट्रिक आणि काही रहिवाशी पत्त्याचा पुरावा देणं गरजेचे असते. भारतामध्ये अनेक सरकारी सेवा, सुविधांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचं कागदपत्र मानलं जातं. त्यामुळे बहुतांश लोकांकडे ते असतंच. आता भारतामध्ये नवजात बालकांना देखील आधार क्रमांक देण्याची प्रक्रिया सुकर करण्यात आली आहे.
नुकतच UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या आधार कार्डसाठी आता अवघ्या दोन कागदपत्रांच्या मदतीने घरपोच मोफत आधार कार्ड मिळणार आहे. यामध्ये बाळाचा जन्म दाखला आणि दोन पैकी एका पालकाचे आधार कार्ड डिटेल्स यांच्याद्वारा नवजात बालकाचेही आधार कार्ड बनवता येऊ शकतं. (Aadhaar Card Update: Face Authentication फीचरचा वापर करून uidai.gov.in वरून आधार कार्ड डाऊनलोड कसं कराल?).
नवजात बालकांसाठी आधार कार्ड अर्ज कसा कराल?
- ask.uidai.gov.in या UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट दया.
त्यावर तुम्हांला इमेल आयडी किंवा मोबाईल नंबरच्या आधारे लॉग ईन करावं लागेल.
- त्यानंतर तुम्ही जो पर्याय निवडला असेल त्याच्या आधारे पुढे काही डिटेल्स भरावे लागणार आहेत.
- 'Send OTP' वर क्लिक करून तुम्हांला अपॉईंटमेंट मिळणार आहे.
- युजरला त्यानंतर बाळाचा जन्मदाखला आणि एका पालकाचे आधार डिटेल्स द्यावे लागणार आहेत.UIDAI ने नुकत्याच केलेल्या घोषणेमध्ये आता mAadhaar वर 35 सेवा उपलब्ध असतील. भारतामध्ये ही सुविधा दोन्ही अॅन्ड्रॉईड आणि आयफोन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. 1947 या आधार हेल्पलाईन नंबर वर तुम्हांला तक्रार नोंदवण्याची सोय आहे. तसेच काही दिवसांपूर्वी आधार कार्ड एटीएम कार्ड सारख्या अंदाजात उपलब्ध करून देण्याची सोय देखील सुरू करण्यात आली आहे.