येत्या 1 डिसेंबर पासून तुम्हाला टीव्ही पाहणे थोडे महागात पडणार आहे. कारण काही निवडक चॅनल्सच्या दरात वाढ केली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चॅनल्ससाठी 50 टक्के अधिक किंमत मोजावी लागणार आहे. देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्स Zee, Star, Sony, Viacom18 ने आपल्या काही निवडक चॅनल्सला ट्राय (TRAI) च्या प्रस्ताविक बुके लिस्टमधून बाहेर केले आहे.(डिजिटल सोने व्यवहार करणं बेकायदेशीर असून या प्रकारापासून गुंतवणूकदारांनी दूर रहावं - SEBI चा इशारा)
स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारखे चॅनल्सच्या दर्शकांसाठी 35 ते 50 टक्के किंमत द्यावी लागणार आहे. सध्या या चॅनल्ससाठी 49 रुपये प्रति महिना द्यावे लागत आहे. परंतु दर वाढवल्यानंतर त्यासाठी 69 रुपये प्रति महिना पैसे द्यावे लागण्याची शक्यता आहे. याच प्रकारे सोनीसाठी 39 रुपयांऐवजी 71 रुपये, तर झी चॅनलसाठी 39 व्यतिरिक्त 49 रुपये, वायकॉम18 साठी 25 रुपये प्रति महिनाऐवजी 39 रुपये मोजावे लागणार आहेत.(Aadhaar Card Update: तुमच्या आधार कार्डवरील जुना फोटो कसा बदलाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (TRAI) च्या नव्या टॅरिफ ऑर्डर लागू केल्याने टीवी पाहणे महागणार आहे. ट्रायने मार्च 2017 मध्ये टीव्ही चॅनल्सच्या किंमतीबद्दल न्यू टॅरिफ ऑर्डर (NTO) जाहीर केले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, NTO 2.0 दर्शकांना फक्त असे चॅनल्स जे तुम्ही निवडले त्याचेच पैसे मोजावे लागत आहेत. परंतु समस्या अशी होती की, ब्रॉडकास्टिंग नेटवर्क ज्या चॅनलचे महिन्याभरसाठी दर 15-25 रुपये दरम्यान ठेवली होती त्यांची किंमत ट्रायकडून 12 रुपये केली गेली. त्यामुळे ब्रॉडकास्टर चॅनलचे नुकसान होत होते. याच कारणामुळे काही प्रसिद्ध चॅनल्सच्या दरात वाढ केली जात आहे.