आज रेल्वे तिकिटासाठी प्रवासी आरक्षण प्रणाली रात्री 11.45 वाजल्यापासून बंद राहणार
Konkan Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

जर तुम्ही आज भारतीय रेल्वेचे तिकिट बुकिंग करणार असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण आज (5 जानेवारी) रात्री 11.45 वाजल्यापासून ते उद्या (6 जानेवारी) पहाटे 6 वाजेपर्यंत प्रवासी आरक्षण प्रणाली बंद ठेवण्यात येणार असल्याची सुचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या वेळेत तिकिटासंबंधित कोणतेच काम पूर्ण होणार नसल्याचे ही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली. मात्र नवे तिकिट दर प्रवाशांना दाखवण्यासाठी ते संकेतस्थळावर अपलोड करताना तांत्रिक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे प्रवाशांना अखेर प्लॅटफॉर्मवरील रेल्वे तिकिट आरक्षणाच्या खिडकीवर जाऊन तिकिट काढावे लागले होते. तर आज नव्या दराबाबत डेटा संकलित करण्यासाठी प्रवासी आरक्षण प्रणाली बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळात इंटरॅक्टिव्ह वॉईस रिपॉन्स सिस्टम, तत्काळ आरक्षण, रिफंड काउंटर्स, कोचिंग रिफंड टर्मिनल आणि पीएनआर या सेवा बंद राहणार आहेत.(1 जानेवारी पासून RuPay कार्ड आणि UPI च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पेमेंटसाठी MDR शुल्क माफ)

तर 1 जानेवारी 2020 च्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू केले जाणार आहे. ज्यांनी काही दिवसाआधी तिकीट काढून ठेवले आहेत, अशा प्रवाशांना दिलासा मिळला आहे. त्यांना आधीच्या तिकीट दरातच रेल्वेतून प्रवास करता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस आणि मेल गांड्याच्या (स्लीपर डब्बा) तिकीट दरात 2 पैसा प्रतिकिलोमीटर तर, एसी क्लास च्या तिकीट दरात 4 पैसे प्रतिकिलोमीटर वाढ केली होती. मात्र, लोकल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.