भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. त्यानुसार जे नागरिक IRCTC च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करतात त्यांच्यासाठी बुकिंग संदर्भतील नियमात बदल करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. खरंतर आयआरसीटीसीच्या माध्यमातून ऑनलाईन तिकिट बुकिंग करणाऱ्यांना आता पडताळणी प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.(Opportunity to Win 15 Lacs: मोदी सरकार देत आहे 15 लाख रुपये कमवण्याची सुवर्ण संधी, घरबसल्या करावे लागेल 'हे' काम)
नव्या नियमांनुसार तुम्ही जर तिकिट बुकिंग करत असाल तर तुम्हाला मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी वेरिफाय करावा लागणार आहे. यामुळे कोणतीही समस्या येणार नाही. हे काम करण्यासाठी तुम्हाला फक्त 50-60 सेकंदाचा अवधी लागणार आहे. मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी वेरिफाय करण्याचा नियम सर्व प्रवाशांसाठी लागू असणार आहे. हा नियम अशा प्रवाशांसाठी लागू नसणार आहे ज्यांनी कोरोनाच्या दीर्घकाळात कोणतीही तिकिट बुक केलेली नाही. अशा प्रवाशांना आधीसारखेच वेरिफिकेशन प्रोसेस करावे लागणार आहे. त्यानंतरच तिकिट बुक करता येईल. मात्र जे प्रवासी सातत्याने तिकिट बुकिंग आणि प्रवास करत आहेत त्यांना असे करण्याची गरज नाही.
वेरिफिकेशन करण्यासाठी नागरिकांना प्रथम आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. येथे एक वेरिफिकेशन विंडोची स्क्रिन सुरु होईल. आता आधीपासून असलेला ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक दिसून येईल. तर डाव्या बाजूला तुम्हाला यामध्ये बदल करण्याचा सुद्धा ऑप्शन दिसून येणार आहे. गरज असेल तर तुम्ही तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकात बदल करु शकता.(GST: कोरोना काळात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवरील जीएसटी केला कमी, पहा किती टक्क्यांनी केला कमी)
स्क्रिनवर दिलेल्या गोष्टींसोबत सहमत असाल तर वेरिफिकेशन ऑप्शन निवडा. असे केल्यास तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी येईल. त्याचसोबत ईमेल आयडीवर ओटीपी ही पाठवला जाणार आहे. तो दिल्यानंतर तुमचा ईमेल आणि फोन क्रमांक वेरिफाय होणार आहे. त्यानंतर तुम्ही सहज तिकिट बुकिंग करु शकता.