जोधपूर: ट्रेनमध्ये प्रवाशाचा संतापजक प्रकार, झोपलेल्या महिलेवर केली लघुशंका
Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

भारतीय रेल्वेमधून प्रवास करणे नागरिकांना आवडते. कारण ट्रेनच्या तिकिटांची किंमत ही सामान्यांपासून सर्वांना परवडते तसेच ट्रेनचा प्रवास हा आरामदायीसह विविध सुविधा पुरवल्या जातात. मात्र दिल्ली-जोधपूर दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने झोपलेल्या व्यक्तीवर लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. तसेच या व्यक्तीने महिलेच्या सामानावर सुद्धा लघुशंका केली.

दिल्ली ते जोधपूर दरम्यान महिला नवऱ्यासोबत AC क्लासमधून प्रवास करत होती. मात्र त्यावेळी एक जागा शिल्लक असल्याने नवरा दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसला होता. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने कोचमध्ये येत त्याने लघुशंका केल्याचा प्रकार घडला असल्याचे महिलेने सांगितले आहे.

या प्रकरणी सदर महिलेने पोलिसात लघुशंका करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. आशुतोष असे आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात येत असून तो जयपुरमधील बरकर नगर येथील रहिवाशी आहे.(उत्तर प्रदेश: रुग्णालयाच्या व्हरांड्यात महिलेने दिला बाळाला जन्म, मदत करण्याऐवजी बघ्यांची गर्दी)

महिलेने व्यक्तीचा हा प्रकार पाहून आरडाओरड सुरु केल्यानंतर कोचमधील अन्य प्रवासी जागे झाले आणि महिलेवर लघुशंका केलेल्या व्यक्तीला बदडून काढले. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली असता त्याला अटक करण्यात आली आहे.