Kargil Vijay Diwas 20th Anniversary: 1999 साली भारत विरूद्ध पाकिस्तान दरम्यान लढल्या गेलेल्या कारगिल युद्धाला आज 20 वर्ष पूर्ण होतं आहेत. कारगिल दिनाच्या 20 व्या वर्षपूर्ती दिनाचं औचित्य साधून पंताप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खास ट्विटरच्या माध्यमातून भारतीय लष्करातील कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'कारगिल विजय दिन' हा कारगिलच्या शिखरांवर लढलेल्या सशस्त्र दलातील जवानांच्या वीरतेला सलाम करणारा दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधून आपण भारताचं रक्षण करणार्या योद्धांच्या धैर्याचं, शौर्याचं स्मरण करून त्याला नमन! सार्या शहीदांचे ऋण आपल्या जीवनावरआयुष्यभर राहणार आहेत. अशी भावना ट्विटरच्या माध्यमातून राष्टृपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्या आहेत. कारगिलच्या 'द्रास' भागात आज विशेष भागामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. Kargil Vijay Diwas 2019: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाची 10 वैशिष्ट्यं
रामनाथ कोविंद यांच्या प्रमाणेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धाच्या विजय दिना दिवशी शहीदांसाठी खास ट्विट करत आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. सैनिकांच्या शौर्याची, साहस आणि समर्पणाची आठवण करून देणारा आजचा कारगिल विजय दिवस असल्याची भावना व्यक्त केली आहे. आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणार्यांना विनम्र अभिवादन असं ट्विट करताना मोदींना भारतीय लष्करातील सैन्यासोबातचे काही जुने फोटोदेखील शेअर केले आहे.
रामनाथ कोविंद यांचे ट्विट
‘कारगिल विजय दिवस’, हमारे कृतज्ञ राष्ट्र के लिए 1999 में कारगिल की चोटियों पर अपने सशस्त्र बलों की वीरता का स्मरण करने का दिन है।
हम इस अवसर पर, भारत की रक्षा करने वाले योद्धाओं के धैर्य व शौर्य को नमन करते हैं।
हम सभी शहीदों के प्रति आजीवन ऋणी रहेंगे।
जय हिन्द! 🇮🇳
— President of India (@rashtrapatibhvn) July 26, 2019
नरेंद्र मोदी यांची शहीदांना आदरांजली
कारगिल विजय दिवस पर मां भारती के सभी वीर सपूतों का मैं हृदय से वंदन करता हूं। यह दिवस हमें अपने सैनिकों के साहस, शौर्य और समर्पण की याद दिलाता है। इस अवसर पर उन पराक्रमी योद्धाओं को मेरी विनम्र श्रद्धांजलि, जिन्होंने मातृभूमि की रक्षा में अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। जय हिंद! pic.twitter.com/f7cpUFLO9o
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2019
3 मे ते 26 जुलै 1999 दरम्यान कारगिल युद्ध (Kargil Conflict )झाले. पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. यानंतर घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुमारे साडे तीन महिने रंगले. हे युद्ध अतिउंच भागावरील युद्धाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील या युद्ध नीतीसाठी भारतीय सैनिकांचे आणि भारताच्या संयमाचे कौतुक करण्यात आलं आहे.