पेट्रोल-डीजल खरेदीवर Indian Oil देत आहेत 'एक्स्ट्रा रिवॉर्ड्स'; बुक माय शो, बिग बास्केट, डॉमीनोज पिझ्झा या ठिकाणी करू शकाल वापर
Indian Oil (Photo Credits-Facebook)

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. यापूर्वी अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात होते, पण आता डिझेलची किंमतही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. पेट्रोल-डिझेल हे जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने त्यावरील खर्च कमी करणे कठीण आहे. पण, आता इंडियन ऑईल (Indian Oil Corporation Limited) तुम्हाला एक ऑफर देत आहे, ज्याद्वारे अशा महागाईच्या काळात तुम्हाला विकत घेतलेल्या पेट्रोलवर काही बक्षिसे मिळतील. इंडिअन ऑईल तुम्हाला बक्षीस म्हणून Loyalty Points वापरण्याची संधी देत आहे.

यामुळे पेट्रोलच्या दरामध्ये काही फरक पडणार नाही, परंतु ई-शॉपिंग करताना तुमचा खर्च कमी होऊ शकतो. हे पॉइंट्स तुम्ही बुक माय शो, बिग बास्केट, डॉमीनोज पिझ्झा, अपोलो अशा ठिकाणी वापरू शकता. इंडियन ऑईल आपल्या ग्राहकांना एक खास सदस्य बनवू इच्छित आहे. जर तुम्ही ते सदस्य झालात तर तुम्हाला पेट्रोलच्या खरेदीवर बरीच बक्षिसे मिळतील.

आपण असे सदस्य होण्यासाठी IndianOil ONE APP वर ऑनलाइन अर्ज करू शकता, त्यानंतर आपल्याला कार्ड मिळेल. यानंतर आपल्याला फक्त या कार्डद्वारेच पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावे लागेल. या कार्डद्वारे पेट्रोल खरेदी केल्याने आपल्याला इतरत्र ऑनलाईन शॉपिंगसाठी मदत होते.

दरम्यान, सोशल मिडियावर एक संदेश व्हायरल होत आहे ज्याद्वारे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त लकी ड्रॉ ऑफर जाहीर केल्याचा दावा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात येत आहे. हा संदेश मोठ्या प्रमाणात प्रसारित केला जात आहे. यामध्ये दावा केला जात आहे की लकी ड्रॉमध्ये भाग घेणार्‍या लोकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्मार्टफोन, टीव्ही इत्यादी गॅझेट जिंकण्याची संधी मिळेल. मात्र हा संदेश व त्यामध्ये नमूद केलेली माहिती पूर्णतः खोटी आहे. प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोच्या (PIB) फॅक चेक टीमने हा संदेश बनावट असून त्याद्वारे लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे म्हटले आहे.