कायदेशीर लढाई जिंकून यूवक झाला नास्तिक; मिळाले ‘नो कास्ट, नो रिलीजन, नो गॉड' सर्टिफिकेट
Atheist | (File Photo)

हरियाणा (Haryana) राज्यातील फतेहाबाद (Fatehabad) येथील टोहाना येथे राहणाऱ्या रवि कुमार (Ravi Kumar) या तरुणाला आता नास्तिक म्हणून ओळखले जाणार आहे. नास्तिक होण्यासाठी या युवकाने कायदेशीर लढाई जिंकली. अखेर रविच्या लढाईला न्याय देत तहसील कार्यालयाने त्याला ‘No Cast, No Religion, No God' Certificate' सर्टिफिकेट दिले आहे. दरम्यान, हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी रवि कुमार याला दोन वर्षे न्यायालयीन लढाई लढावी लागली. अशा पद्धतीचे सर्टिफिकेट मिळवणारा रवि कुमार हा देशातील बहुदा दुसरा व्यक्ती आहे. आधी केरळ राज्यातील एका महिलेनेही हे सर्टिफिकेट मिळवले होते.

प्राप्त माहितीनुसार, रवि कुमार याने 2017 मध्ये आपले नाव योग्य करण्यासाठी फतेहाबाद कोर्टामध्ये दीवानी दावा दाखल केला होता. त्यानंतर या वर्षाच्या जानवारी महिन्यात रवि कुमार याला आपल्या नावासोबत नास्तिक लिहण्याची परवानगी मिळाली होती. त्यानंतर उपायुक्तांच्या आदेशानंतर रवि कुमार तहसील कार्यालयाने 'नो कास्ट, नो रिलीजन, नो गॉड' सर्टिफिकेट ' दिले.

रवि कुमार यांच्या वडीलांचे नाव इंद्रलाल असे आहे. त्यांचा फर्नीचर खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. रवि कुमार याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आपली ओळख विशेष वर्ग, अथवा जातीमध्ये व्हावी असे त्याच्या वडीलांना वाटत नव्हते. त्यामुळे त्याने आपल्याला ‘नो कास्ट, नो रिलीजन, नो गॉड' सर्टिफिकेट मिळावे अशी फतेहबाद उपायुक्तांकडे मागणी केली. सेल्प डिक्लेयरेशन नंतर त्याला हे प्रमाणपत्र देण्यात आले.(हेही वाचा, Maratha Caste Certificate : जात प्रमाणपत्र ऑनलाईन, ऑफलाईन मिळवण्यासाठी अर्ज कसा कराल? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?)

रवि कुमार याचे वकील अमित सैनी यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, ‘नो कास्ट, नो रिलीजन, नो गॉड' सर्टिफिकेट ‘नो कास्ट, नो रिलीजन, नो गॉड' सर्टिफिकेट' देण्यासाठी सुरुवातीला तहसील कार्यालयाने असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर उपायुक्तांकडे अर्ज करण्यात आला. रवि कुमार याची सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर त्याला २९ एप्रिल रोजी हे प्रमाणपत्र देण्यात आले.