Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्य दलात नोकर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी. कारण तरुणांना टेरिटोरियल आर्मी मध्ये भरती होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यानुसार या नोकर भरतीसाठी एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jointerritorialarmy.gov.in येथे अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात येत्या 20 जुलै पासून सुरु होणार आहे. तर अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2021 दिली गेली आहे. तसेच शुल्क जमा करण्याची अखेरची तारीख 19 ऑगस्ट असून लेखी परीक्षा 25 सप्टेंबर 2021 रोजी घेतली जाणार आहे. तर टेरिटोरियल आर्मीसाठी काढण्यात आलेल्या नोकर भरतीअंतर्गत निवडण करण्यात येणाऱ्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 10 नुसार 56,100 रुपये प्रति महिना ते 1,77,500 रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.(NABARD Application 2021: नाबार्ड मध्ये 162 असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर पदांसाठी नोकर भरती, अर्ज प्रक्रियेसंबंधित जाणून घ्या अधिक)
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 200 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. तसेच अर्ज केल्यानंतर लेखी परीक्षा सुद्धा उमेदवारांना द्यावी लागणार आहे. प्रादेशिक सेना म्हणजेच टेरिटोरियल आर्मीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट असणे अनिवार्य आहे. त्याचे वय 18 वर्ष ते 42 वर्षादरम्यान असावे. वयाची मोजणी 19 ऑगस्ट 2021 पर्यंतच्या वयाच्या आधारावर केली जाणार आहे.