भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायूदल यांच्याकडून देशभरातील Corona Warriors ना अनोख्या पद्धतीने मानवंदना; पाहा Photos आणि Videos
Indian Army, Navy, Air Force Honouring COVID-19 Warriors (Photo Credits: ANI)

संपूर्ण जगाला जेरीस आणलेल्या कोविड 19 च्या दुष्टचक्रात भारत देशही अडकत चालला आहे. त्यामुळे सध्याचा काळ कठीण आहे. मात्र या कठीण काळात जीवाची बाजी लावून पोलिस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा पुरवणारे सर्वचजण अविरतपणे कार्य करत आहेत. या सर्वांना सलामी देण्यासाठी भारतीय सेना सज्ज झाली आहे. आज 3 मे दिवशी देशभरातील सर्व हॉस्पिटल्स वर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे. तर भारतीय जवान नौदल आणि वायुदलाकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज सकाळपासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. कोरोना योद्धांना दिलेली ही सलामी नक्कीच त्यांचे कोरोना संकटाविरुद्ध लढण्याचे बळ वाढवेल. मुंबईतील KGH, KEM, JJ आणि INHS Asvini रुग्णालयातील कोरोना वॉरीयर्सवर पुष्पवृष्टी करत भारतीय सैन्य, नौदल, वायुदलाची सलामी! (See Photos & Video)

पहा फोटोज आणि व्हिडिओज:

 

दिल्ली येथील लोकनायक जय प्रकाश नारायण हॉस्पिटलवर झालेली पुष्पवृष्टी:

राजस्थान येथील जयपूर मधील Sawai Maansingh Hospital दृश्यं:

मेघालय शिलोंग येथील सिव्हील हॉस्पिटलमधील मेडिकल स्टाफचे आभार:

दिल्ली मधील All India Institute of Medical Sciences वर IAF च्या हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव

लेह मधील SNM Hospital:

मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील Chirayu Medical College & Hospital:

बंगालच्या उपसागरात नौसेनकडून कोरोना योद्धांना सलामी!

चेन्नईतील Rajiv Gandhi Government General Hospital वर पुष्पवर्षाव:

तेलंगणा येथील हैद्राबादमधील गांधी हॉस्पिटल:

बिहार: पटना येथील All India Institute of Medical Sciences वर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव

 

पश्चिम बंगाल: कोलकता मधील Command Hospital वर फुलांचा वर्षाव.

आसाम मधील Guwahati Medical College and Hospital वर पुष्पवर्षाव.

यापूर्वी अनेकदा पोलिस, डॉक्टर्स यांच्यावर हल्ले करणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ले केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा नवा सुधारित कायदा लागू करण्यात आला आहे. तसंच कोरोना व्हायरसच्या गंभीर काळात पोलिस कर्मचारी, आरोग्य सेवक आपला जीव पणाला लावून केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. त्यामुळे बेजबाबदारपणे वागून त्यांच्यावरील ताण अधिक न वाढता नियमांचे पालन करुन त्यांना सहकार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे.