Flower Shower AT INHS Hospital Corona Warriors (Photo Credits: ANI)

Corona Warriors: मागील कित्येक महिन्यांपासून कोरोनाच्या महाभयंकर विषाणूशी लढत असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आज भारताच्या सैन्य, नौदल व वायुदलाने अनोख्या मार्गाने सलाम केला. देशभरातील अनेक रुग्णालयांवर इंडियन एअर फोर्स (IAF) ची लढाऊ विमाने फ्लायपास्ट करणार आहेत तर नौदलाच्या (Indian Navy) हेलिकॉप्टर्स मधून पुष्पवृष्टी केली जात आहे. काहीच वेळापूर्वी मुंबईतील कोरोना वॉरीयर्सना सुद्धा अशाच प्रकारे सलामी देण्यात आली. मुंबईतील KGH, KEM, JJ आणि INHS Asvini या रुग्णालयावरून वायुदलाच्या विमानाने फ्लायपास्ट केले तर INHS Asvini या नौदलाच्या रुग्णालयावर हेलिकॉप्टर्स मधून पुषवृष्टी करण्यात आली. यावेळी डॉक्टर्स, नर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा सैन्याला सलाम केला. या प्रसंगाचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायूदल यांच्याकडून देशभरातील Corona Warriors ना अनोख्या पद्धतीने मानवंदना; पाहा Photos आणि Videos

तसेच, बंगालच्या उपसागरात आयएनएस Jalashwa या नौकेवर कोरोना वॉरियर्सना सलाम करत Thank You लिहिण्यात आले होते. या जहाजाच्या माध्यमातून गल्फ देशातून भारतीयांना परत आणण्यात आले होते.

INHS हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांवर पुष्पवृष्टी

मरीन ड्राईव्ह वर Fly Past

INS Jalashwa वरील दृश्य

दरम्यान, भारतीय सैन्याने प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटलजवळ बॅन्ड परफॉरमेंस देण्याचा निर्णय घेतला आहे. हे बँड शो सुमारे एक तास चालतील. या माध्यमातून कोरोना वॉरियर्सना सलाम करण्यात येईल. नेव्ही आपल्या युद्धनौकांवर विजेची रोषणाई करेल.