Photo Credit- X प्रतिकात्मक प्रतिमा

Indian Army Destroyed Airbases Of Pakistan: सध्या भारत आणि पाकिस्तामधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अशातचं आता भारत सरकार (Government of India) ने एका विशेष पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य (ndian Army Destroyed Airbases Of Pakistan) करून अचूक आणि संतुलित प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान सतत चिथावणीखोर कारवाया करत असताना भारताने ही कारवाई केली. सरकारी ब्रीफिंगनुसार, भारतीय सैन्याने रफीकी, मुरीद, चकलाला आणि सियालकोट हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत. याशिवाय, पसरूरमधील दोन रडार तळांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. सरकारने म्हटले आहे की, या कारवाईत आजूबाजूच्या परिसराचे कोणतेही नुकसान न होता फक्त शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.

दरम्यान विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या की, पाकिस्तानी सैन्य सीमेकडे आपले सैन्य हलवत आहे, यावरून स्पष्ट होते की त्यांना वातावरण बिघडवायचे आहे. परंतु भारतीय सैन्य पूर्णपणे सतर्क आहे आणि प्रत्येक हल्ल्याला प्रभावी आणि संतुलित प्रत्युत्तर देत आहे. (हेही वाचा - India-Pakistan Tension: 'भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोन, लांब पल्ल्याच्या शस्त्रे, दारूगोळा आणि लढाऊ विमानांचा वापर'; Colonel Sofiya Qureshi यांची माहिती (Video))

तथापि, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला आहे की, युद्धाची भीती आता अधिकच वाढू लागली आहे. भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानने जम्मू-श्रीनगर, पठाणकोट आणि पोखरण सारख्या भागात ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने प्रत्येक वेळी त्यांचे मनसुबे हाणून पाडले.

अमृतसरच्या खासा कँटमध्येही ड्रोन हल्ला अयशस्वी -

पाकिस्तानने आज पहाटे 5 वाजता अमृतसरच्या खासा कॅन्ट भागात अनेक शस्त्रास्त्रांनी भरलेले ड्रोन पाठवले. पण भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने वेगाने कारवाई केली आणि शत्रूचे हे सर्व ड्रोन पाडले. लष्कराने स्पष्टपणे म्हटले आहे की, पाकिस्तान ड्रोन आणि शस्त्रास्त्रांद्वारे पश्चिम सीमेवर सतत हल्ले करत आहे, परंतु आमची तयारी पूर्ण आहे आणि प्रत्येक हल्ल्याला त्वरित प्रत्युत्तर दिले जात आहे.

पाकिस्तानकडून नागरी भागांना लक्ष्य करण्यात येत आहे -

पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तान आता नि:शस्त्र नागरी क्षेत्रांनाही लक्ष्य करत आहे. पाकिस्तानी सैन्याने वैद्यकीय केंद्रे आणि शाळेच्या परिसरात हल्ला केला आणि नागरी विमानांच्या आडून हवाई मार्गांचा गैरवापर केला. नियंत्रण रेषेवर कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ आणि राजौरी येथे गोळीबाराचे प्रयत्न झाले, ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.