Coronavirus Cases (Photo Credits: PTI)

भारतात दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. दुसऱ्या बाजूला अनलॉक नुसार काही गोष्टी सुरु करण्यात आल्याने मात्र रुग्णांचा आकडा वाढला जात आहे. याच दरम्यान कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी अद्याप काही गोष्टी सुरु करण्यात परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनाबाधित रुग्णांवर देशातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तर आता भारतातील कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट हा 63.24 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासात ही कोरोनाच्या बहुतांश संख्येने रुग्णांची प्रकृती सुद्धा सुधारली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5,92,031 असून त्यामधील 20,572 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनाबाधितांचा मृत्यू दर ही काहीसा कमी झालेला यापूर्वी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये म्हणून सरकारकडून सर्वोतोपरी खबरदारी घेतील जात आहे. तसेच वेळोवेळी कोरोनासंबंधित नव्या मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या जातात. त्यानुसार नागरिकांना नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जाते. परंतु ज्या व्यक्तींकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येते त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे.(Coronavirus in Bihar Raj Bhavan: भाजप मुख्यालयानंतर बिहारच्या राजभवनात कोरोना व्हायरसचा शिरकाव; तब्बल 20 जणांना झाली लागण) 

दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील 24 तासात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाल्याचे समजत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात देशात 29,429 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 582 मृत्यू झाला आहे. यानुसार देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 9,36,181 वर पोहचला आहे. यापैकी, यापैकी 3,19,840 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत, 5,92,032 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 24,309 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे. देशात कोरोना मृत्य दराची सरासरी पाहिल्यास 96.05टक्के : 3.95 टक्के अशी असल्याचे सुद्धा आरोग्य विभागाने सांगितले आहे.