Coronavirus in Bihar Raj Bhavan: भाजप मुख्यालयानंतर बिहारच्या राजभवनात कोरोना व्हायरसचा शिरकाव; तब्बल 20 जणांना झाली लागण
Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

बिहार (Bihar) मध्ये कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पाटणा येथील सीएम हाऊस (CM House) नंतर कोरोना विषाणूने आता राजभवनात (Raj Bhavan) प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यातील राजभवनाच्या सुरक्षाविभागासह अन्य विभागांशी संबंधित 20 जण कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. अशा प्रकारे इतक्या मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने, राजभवनात खळबळ उडाली आहे. याआधी मंगळवारी बिहारमध्ये कोरोना विषाणूने भाजप मुख्यालयात (Bihar BJP Headquarters) शिरकाव केला होता. तिथे 75 कामगार आणि अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्यासह त्यांची पत्नी आणि आईसुद्धा या आजाराला बळी पडले आहेत. मात्र राज्यपालांच्या आसपास वावरणारे सर्व कर्मचारी सुरक्षित असून, त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे दिसून आले आहे. राज्यपालांचे प्रधान सचिव चैतन्यप्रसाद यांचे गेट उघडणाती व्यक्तीही कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. प्राप्त माहितीनुसार दररोज सुमारे 40 जणांचे नमुने घेतले जात आहेत. दरम्यान, अशी बातमीही मिळाली आहे की, राज्यपाल कक्षात राहणारे प्रधान सचिव नीरज कुमार,  आदेशपाल बलिराम दास दीपू, सफाई कर्मचारी अजय कुमार आणि महामहिमचे आदेशपाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (हेही वाचा: Coronavirus: बिहार भाजप मुख्यालयात कोरोना व्हायरस संसर्ग; 110 पैकी 24 जण कोविड 19 पॉझिटीव्ह)

अशाप्रकारे बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संपूर्ण राजभवन क्वारंटाइन करण्यात आला आहे. राजभवनात कोणालाही प्रवेश करण्यास बंदी घातली गेली आहे. अगदी राजभवन कॉलनीमध्येही हा संसर्ग पसरला असून, तो परिसर आता कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. दुसरीकडे कोरोना संसर्गाच्या फैलावाची पाटणा पोलिसांनाही धास्ती घेतली आहे. पाटणा पोलिसांचे सुमारे 60 अधिकारी आणि जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील 20 जण पोलिस लाइन बॅरॅकमध्ये राहत आहेत. मंगळवारी 18 हवालदार यांची चाचणी सकारात्मक आली.

दरम्यान, बिहारमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली आहे व दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने खासदार ते मंत्री-आमदार आणि आयएएस, आयपीएस अधिकारी अशा अनेक व्हीआयपींनाही ग्रासले आहे.