India’s first ‘Generation Beta’: 2025 हे नवं वर्ष सुरू झालं आहे. या नव्या वर्षासोबत आता नवी जनरेशन देखील सुरू होत आहे. 1 जानेवारी 2025 पासून पुढे जन्म घेणारी पिढी आता 'जनरेशन बीटा' म्हणून ओळखली जाणार आहे. भारतामध्ये या 'जनरेशन बीटा' मधील पहिलं बाळ हे मिझोराम मधील आहे. Frankie Remruatdika Zadeng असं या बाळाचं नाव आहे. 2025 -2039 यामध्ये जन्म घेणारे Generation Beta या पीढीचे म्हणून ओळखले जाणार आहेत.
Frankie चा जन्म 1 जानेवारी 2025 दिवशी रात्री 12 वाजून 3 मिनिटांनी झाला आहे. Mizoram ची राजधानी Aizawl च्या Durtlang मधील Synod Hospital मध्ये या बाळाचा जन्म झाला आहे. हॉस्पिटल प्रशासनानुसार, या बाळाचं वजन जन्माच्या वेळी 3.12 किलो आहे. नक्की वाचा: Generation Beta: आता Gen Alpha आणि Gen Z चा काळ झाला जुना; 2025 पासून येणार जनरेशन बीटा; जाणून घ्या काय असेल खास .
बाळाची आई Ramzirmawii ही 31 डिसेंबर 2024 ला संध्याकाळी 6 च्या सुमारास हॉस्पिटल मध्ये दाखल झाली होती. बाळ आणि आई दोन्हींची प्रकृती उत्तम आहे. दरम्यान आपण भारत देशात पहिला Gen Beta मुलाला जन्म दिला आहे ही बाब तिच्यासाठी देखील सुखावह आहे. Ramzirmawii आणि तिचा पती Remruatsanga Zadeng या दोघांना ही या गोष्टीची माहिती झाली तेव्हा त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आपलं बाळ भारतातलं पहिलं Gen Beta baby असल्याचं ऐकून त्यांनाही आनंद झाला आहे. दरम्यान या दांम्पत्याचं कुटुंब Aizawl च्या Khatla East भागात राहते.