Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आज 22 लाख 15 हजार 75 पर्यंत पोहचला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान मागील 24 तासांत देशभरात 62,064 नवे रूग्ण समोर आले आहेत. तर सुमारे 1007 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात अजूनही 6,34,945 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत भारतामध्ये 15,35,744 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 44,386 जणांची कोरोना सोबतची झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा बळी गेला आहे.

आज ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत भारतात एकूण 2,45,83,558 नमुन्यांची कोविड 19 साठी तपासणी झाली आहे. यामध्ये काल (9 ऑगस्ट) 4,77,023 नमूने तपासण्यात आले आहेत. तर देशामध्ये कोरोनावर मात करून घरी परतणार्‍यांच्या संख्येमध्ये सुधार आहे. भारतामध्ये कोविड 19 वर मात करून घरी परतणार्‍यांचा टप्पा 15 लाखांच्या पार गेला आहे. India's COVID-19 Recoveries: भारतात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15 लाखांच्या पार; 10 राज्यांमध्ये कोविड-19 चा संसर्ग केंद्रीत- आरोग्य मंत्रालय.

ANI Tweet

भारताचा रिकव्हरी रेट सुधारत असला तरीही नवे रूग्ण समोर येण्यामध्ये देशातील 10 राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. देशात 10 राज्यांमध्ये 80% पेक्षा अधिक रूग्ण नव्याने समोर येत आहेत.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये रूग्ण संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात काल रात्री आरोग्य मंत्रालय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 12248 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण रूग्णसंख्या आता 515332 झाली आहे. दरम्यान काल 13348 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 351710 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण 145558 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.