COVID 19 | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतामध्ये आज मागील 46 दिवसांमधील सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची संख्या नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात काल दिवसभरामध्ये 1,73,790 नव्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. तर देशातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या देखील कमी होत आहे हे दिलासादायक बाब आहे.मागील 24 तासांत अ‍ॅक्टिव्ह रूग्ण कमी होण्याचं प्रमाण 1,12,428 आहे. त्यामुळे सध्या देशात कोरोनाचे उपचार घेणारे 22,28,724 रूग्ण आहेत.

दरम्यान मागील 24 तासांत कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या 2,84,601 इतकी आहे. त्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 2,51,78,011 इतकी झाली आहे. सध्या देशाचा रिकव्हरी रेट देखील 90.80% आहे. दर विकली पॉझिटिव्हिटी रेट 9.84% आहे तर दिवसाचा 8.36% आहे. मागील सलग 5 दिवस हा दर 10% कमी ठेवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. (नक्की वाचा: Saline Gargle RT-PCR Testing Method: नागपूरच्या NEERI संस्थेने विकसित केले मीठाच्या पाण्याने गुळण्यांच्या माध्यमातून कोविडचं निदान करणार उपकरण; 3 तासांत मिळणार अहवाल).

ANI Tweet

भारतामध्ये आता मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वैयक्तिक स्वच्छता पाळण्यासोबतच कोवीड 19 संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम वेगवान करण्याचादेखील प्रयत्न सुरू आहे.देशात आतापर्यंत 20,89,02,445 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्फुटनिक वी अशा तीन लसी 18 वर्षांवरील सार्‍यांना देण्याचं काम सुरू केले आहे.