क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बद्दल आरबीआय (RBI) काय घोषणा करणार किंवा काय विचार करतात याबद्दल भारतीय लोकांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होताना दिसून येत नाही आहे. देशात क्रिप्टोकरन्सच्या प्रती अधिक उत्सुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. BrokerChooser च्या एका रिपोर्ट्सनुसार आपल्या देशात 10 कोटीहून अधिक लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहे. हा आकडा जगभरात सर्वाधिक आहे. या प्रकरणी अमेरिका, चीन, इंग्लंड आणि युरोपातील अन्य देशांना पाठी टाकले आहे.
या लिस्टमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर अमेरिका आणि रशियाचा क्रमांक येतो. तर भारतात 7.3 टक्के जनसंख्येकडे क्रिप्टो होल्डिंग्स आहे. यामध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. जनसंख्येच्या टक्केवारीनुसार युक्रेन पहिल्या क्रमांकावर आहे. तेथील 12.73 टक्के जनसंख्येकडे क्रिप्टो होल्डिंग्स आहेत. त्यानंतर रशियाचा क्रमांक येतो. तेथे 11.91 टक्के, केनिया मध्ये 8.52 टक्के आणि अमेरिकेत 8.31 टक्के जनसंख्येकडे क्रिप्टो होल्डिंग्स आहेत.
इंटरनेटवर क्रिप्टोकरन्सी सर्च प्रकरणी भारताचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या 12 महिन्यात भारतात एकूण 36 लाख वेळा याबद्दल सर्च करण्यात आले. अमेरिका या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. येथे गेल्या 12 महिन्यात एकूण 69 वेळा सर्च केले गेले.(Global Hunger Index 2021: धक्कादायक! भारतामध्ये अन्नटंचाई, देशातील उपासमारी वाढली; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानची स्थिती चांगली)
क्रिप्टोकरन्सी अॅडॉप्शन बद्दल ऑगस्टमध्ये आणखी एक रिपोर्ट आला होता. त्यानुसार, ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात क्रिप्टो बाजारात गेल्या एका वर्षात 641 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, भारतातील क्रिप्टो गुंतवणूकदारांचे वय 21-35 वर्षादरम्यान आहे. या व्यतिरिक्त CoinSwtich Kuber, वजीर एक्स आणि क्वॉइन DCX सारखे क्रिप्टो एक्सचेंजची प्रसिद्धी अधिक वाढली आहे.
गेल्या दोन दिवसात एक रिपोर्ट ही आला होता. त्या रिपोर्टनुसार, युजर्सच्या प्रकरणी काही क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजने देशातील सर्वाधिक मोठा स्टॉक ब्रोकर जीरोधाला मागे टाकले. जिरोधाचे एकूण युजर्सची संख्या 7 मिलियन आहे. तर कुबेर युजर्सची संख्या 11 मिलियन आणि वजीर एक्सच्या युजर्सची संख्या 8.3 मिलियन आहे.