देशातील रस्ते हे अमेरिकेसारखे पुढील 3 वर्षात दिसतील- नितीन गडकरी
File image of Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील तीन वर्षात देशभरातील रस्ते हे अमेरिकेतील रस्त्यांसारखे असतील असे विधान केले आहे. शनिवारी गुजरात मधील बनासकांठा येथे असलेल्या दीसा मध्ये पावणे चार किमीच्या एलिवेटेड कॉरिडोअरचे लोकार्पण करत गडकरी यांनी सध्याच्या देशातील महामार्ग निर्माण करण्याच्या कामांबद्दल सांगितले. त्यांनी असे ही म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देभरात महामार्ग निर्माण करण्याचे काम खुप वेगाने सुरु आहे.(Driving License New Rule: ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे झाले आणखी सोपे, आरटीओतही जाण्याची गरज नाही; केंद्र सरकारकडून 'हा' नियम लागू)

गडकरी यांच्यानुसार, एके काळी देशात रोज दोन किमी लांबीच्या वेगाने राष्ट्रीय महामार्गत तयार केले जात होते. मात्र सध्या हेच काम 38 किमी प्रतिदिन असे झाले आहे. तसेच लोकार्पणासाठी उपस्थितीत राहिलेले मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना गडकरी यांनी असे म्हटले की, भारतमाला प्रकल्पाअंतर्गत राज्यात काही मोठे प्रोजेक्ट्स सुरु आहेत. त्यामध्ये भूसंपादनाशी संबंधित अडथळे लवकरात लवकर दूर केले पाहिजेत, जेणेकरून पायाभूत सुविधांच्या विकासाला गती येईल.

कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम जोरात सुरू आहे. एकदा राष्ट्रीय महामार्ग प्रतिदिन 2 किमी वेगाने बांधला जात होता आणि आता आम्ही दररोज 38 किमी पर्यंत पोहोचलो आहोत. मला विश्वास आहे की पुढील तीन वर्षात देशाला अमेरिकन दर्जाचे रस्ते मिळतील.गुजरातमधील भारतमाला प्रकल्पांतर्गत 25,370 कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्पांतर्गत 1,080 किलोमीटर रस्ता तयार केला जात आहे. भारतमाला प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा नंतर संपूर्ण हिमालयीन प्रदेशात महामार्ग बांधले जाणार आहेत.(How to Apply For Ration card Transfer: दुसर्‍या राज्यात गेल्यास रेशन कार्ड ट्रान्सफर कसं कराल? आवश्यक कागदपत्रं कोणती?)

गडकरी यांच्या मते, दक्षिण गुजरातमधील वडोदरा ते किम यांना जोडणारा 125 किलोमीटर लांबीचा महामार्ग या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाची किंमत 8,711 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील मागास भाग आणि आदिवासींसाठी वरदान ठरेल. हा प्रकल्प या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आणि व्यवसाय आकर्षित करेल, ज्याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होईल. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे कामही अतिशय वेगाने सुरू आहे. ते म्हणाले की, अमृतसर-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरचे कामही सुरू झाले आहे. त्याचबरोबर, ढोलेरा-अहमदाबाद द्रुतगती मार्ग 109 किमी लांबीचा 3,000 कोटी रुपये खर्च करून या वर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.