India-China Border Tensions: राष्ट्राची रक्षा आणि सुरक्षिततेबाबत कधी बोलणार? राहुल गांधी यांनी ट्वीट करत पुन्हा मोदी सरकारवर साधला निशाणा
Rahul Gandhi (PC - Twitter)

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत-चीन सीमावाद प्रकरणी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांनी असे म्हटले आहे की, कधी होणार राष्ट्राची रक्षा आणि सुरक्षिततेबाबत कधी बोलणार? असा सवाल उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी सुद्धा राहुल गांधी यांनी ट्वीटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.(नरेंद्र मोदी शांत आहेत, त्यांनी कोरोना व्हायरस समोर शरणागती पत्करली; राहुल गांधी यांचे ट्विट)

चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधत शुक्रवारी राहुल गांधी यांनी ट्वीट करत असे म्हटले होते की, आपल्या जवानांना हत्याऱ्यांच्या शिवाय कोणी आणि का पाठवले होते? दरम्यान, चीनच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि भाजप पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मात्र याच कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित मुद्द्यांवरुन राजकरण करण्यात येऊ नये असे म्हटले आहे. तसेच पवार यांनी पुढे असे ही म्हटले की, 1962 च्या युद्धानंतर चीनने भारताच्या 45,000 क्वेअर फूट जमिनीवर कब्जा केला होता. (India-China Border Tensions: भारत-चीन तणावाप्रकरणी शरद पवार म्हणाले- 1962 मधील घटना लक्षात ठेवा; राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन राजकरण योग्य नाही)

तर 5 जून रोजी गलवानच्या खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. सुत्रांच्या मते चीनीच्या सैन्यातील जवळजवळ 43 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. यामध्ये  चीनच्या एका कर्नलने सुद्धा जीव गमावल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेनंतर भारत आणि चीन मध्ये तणाव अधिक वाढला आहे. परंतु दोन्ही देश एकमेकांसोबत बातचीत करुन हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.