नरेंद्र मोदी शांत आहेत, त्यांनी कोरोना व्हायरस समोर शरणागती पत्करली; राहुल गांधी यांचे ट्विट
Congress president Rahul Gandhi-Prime Minister Narendra Modi | (Photo Credit: PTI)

देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus In India) प्रसार दिवसागणिक वाढत आहे, मात्र या संंकटाला लढा देण्यासाठी सरकारकडे काहीच प्लॅन तयार नाही, उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे शांंत बसुन या कोरोना संकटाचा विषयच टाळत आहेत, याचाच अर्थ म्हणजे कोरोनाचे प्रकरण आता हाताबाहेर गेलेले असुन मोदींंनी कोरोनासमोर शरणागती पत्करली आहे. अशा शब्दात आज कॉंंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका करणारे ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी प्रिंट या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समूहाची (जीओएम) अखेरची बैठक 9  जून रोजी झाली. कोरोना व्हायरस संदर्भातील शेवटचे आरोग्य मंत्रालयाचे ब्रीफिंग दोन दिवसांनंतर 11 जून रोजी झाले. ICMR ची टास्क फोर्स बैठक दोन आठवड्यांपूर्वी झाली, मात्र त्यानंतर मोदी शांतच आहे, याचा अर्थ कोव्हीड लढ्यात सरकारकडे काहीही प्लॅन नाही असे दिसून येत आहे.

राहुल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राजधानी दिल्लीतील बिघडलेल्या परिस्थितीचा थेट कारभार आपल्या हाती घेऊन काम करत आहेत, मात्र उर्वरित सरकारी यंत्रणा, कुठेही दिसून येत नाहीये असाही आरोप केला आहे. 'चीनला आपल्या जमीनीवरुन हकलवून लावू फक्त तुम्ही खरे काय ते सांगा' कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन

राहुल गांधी ट्विट

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने आज 5 लाखाचा मोठा टप्पा ओलांडला आहे. भारतात काल दिवसभरात 18,552 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 08 हजार 953 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 384 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांचा आकडा 15,685 वर पोहोचला आहे. देशात काल 10,244 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 2,95,881 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.