Jagdeep Dhankhar Mimicry | (Photo credit: archived, edited, representative image)

राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर (Rajya Sabha Speaker Jagdeep Dhankhar) यांची TMC खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी केलेली नक्कल (Jagdeep Dhankhar Mimicry) सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ही नक्कल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गल्ली ते दिल्ली राजकारण तापले आहे. इतकेच नव्हे तर चक्क संसदेमध्येही इंडिया आघाडी (INDIA Alliance) विरुद्ध भाजप प्रणित एनडीए (NDA) असा सामना रंगला आहे. एनडीएतील खासदार आक्रमक झाले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीतील नेते आणि खासदारांनी हे प्रकरण इतके महत्त्वाचे नाही, त्यावरुन माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे म्हणत सत्ताधाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वत: जगदीप धनखर, आणि इतर अनेक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर ममता बॅनर्जी, संजय राऊत आणि इतर अनेक नेत्यांनी केंद्र सरकार आणि भाजप लोकांचे लक्ष भलतीकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही राज्यघटना मानणारे लोक आहोत, आणि मानत राहू अशा आशयाचे विधान केले आहे.

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांनी घसरणीची गाठलेली ही नवी पातळी आहे. अशा प्रकारे उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापतींची खिल्ली उडवणे योग्य नाही. विरोधकांनी त्यांचा कितीही अपमान केला तरी आम्ही त्यांच्याप्रती कायम आदर ठेऊ.खरे तर विरोधकांनी या कृतीबद्दल माफी मागायला पाहिजे, असेही जोशी यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला भाजप आणि एनडीएतील महिला खासदार राजघाटावरील गांधी पुतळ्यावर जाऊन क्लेश व्यक्त करणार आहेत. तर, सभागृहातील खासदार सभापतींप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी काही काळ उभे राहणार आहेत. (हेही वाचा, PM Modi Expressed Pain: संसदेच्या आवारात उपराष्ट्रपतींची नक्कल करणे हे घृणास्पद, पंतप्रधानांनी फोन करुन व्यक्त केली खंत)

'माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता'

निलंबनानंतर संसदेबाहेर नक्कल केल्यावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांचा अपमान झाल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बुधवारी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "कोणाला दुखावण्याचा माझा कधीच हेतू नव्हता...महत्त्वाचा प्रश्न असा की, ते खरोखरच राज्यसभेत असे वागतात का? खुद्द पंतप्रधानांनी 2014 ते 2019 दरम्यान लोकसभेत अनेकदा मिमिक्री केली होती." (हेही वाचा - Kalyan Banerjee Mimics Jagdeep Dhankhar: खासदारांकडून राज्यसभा सभापतींची नक्कल, राहुल गांधी यांनी केले चित्रीकरण (Watch Video))

कल्याण बॅनर्जी व्हिडिओ

'संसदीय पक्ष उत्तर देईल'

दरम्यान, पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या मिमिक्रीच्या वादाबाबत बोलताना टीएमसीच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "माझा संसदीय पक्ष यावर उत्तर देऊ शकतो. ते निर्णय घेण्यासाठी पुरेसे आहेत."

ममता बॅनर्जी व्हिडिओ

पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष संविधानाचा आदर करत नाही

शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी मिमिक्री वादावर बोलताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष संविधानाचा आदर करत नाही. पण आम्ही विरोधी पक्ष आहोत. आम्ही संविधानाचा आदर करतो आणि आपण सर्वांनीच केला पाहिजे.

संजय राऊत व्हिडिओ

दरम्यान, राज्यसभा सभापतींची नक्कल हा सध्या राजकीय वादाचा विषय ठरला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापासून ते भाजप नेत्यांपर्यंत सर्वांनीच या वादात प्रतिक्रिया दिली आहे. ज्या सोशल मीडियावर आणि इंटरनेवरही उपलब्ध आहेत.