विंग कमांडर अभिनंदन पुन्हा लढाऊ विमान चालवणार? वायुसेना प्रमुखांनी दिले उत्तर
विंग कमांडर अभिनंदन पुन्हा लढाऊ विमान चालवणार? वायुसेना प्रमुखांनी दिले उत्तर (फोटो सौजन्य-Twitter)

भारतीय वायुसेना (Indin Air Force)  प्रमुख बीएस धनोआ (BS Dhanoa) यांनी सोमवारी (4 मार्च) पत्रकार परिषदेमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर बलकोट (Balkot) मध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन (Abhinandan) यांच्याबाबत धनोआ यांना प्रश्न विचारल्यास त्याचे त्यांनी अशा पद्धतीने उत्तर दिले आहे.

कोयंबटूर येथे आयोजन करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत धनोआ यांना विंग कमांडर पुन्हा कधी लढाऊ विमान चालवणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी धनोआ यांनी असे म्हटले की. सध्या अभिनंदन यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तसेच वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असेल तरच ते लढाऊ विमान चालवू शकणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.(हेही वाचा-IAF एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा- अमित शाह)

तर पुलवामा भ्याड हल्ल्यात सीआरपीफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला प्रतिउत्तर देत बालकोट, मुजफ्फराबाद आणि चकोटी येथे हल्ला करण्यात आला. त्यावेळी तणावाखाली आलेल्या पाकिस्तानने त्यांची विमाने भारताच्या हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हासुद्धा भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला प्रतिउत्तर देत त्यांचे एफ-16 हे विमान उद्ध्वस्त करुन लावले होते.