Income Tax (Photo Credits: Pixabay)

New Income Tax Slab 2020-21: मोदी सरकारकडून यंदाचे अर्थसंकल्प 2020-21 सादर करण्यात येत आहे. हे बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण वाचून दाखवत असून त्यांनी नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. कारण कराची प्रक्रिया आता सरळ आणि सोपी करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सरकारने टॅक्स स्लॅबमध्ये सुद्धा बदल केला आहे.

सीतारमण यांनी त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी कराबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार अडीच लाख उत्पन्नावर कोणताही कर नाही पण 2.5 ते 5 लाखापर्यंत 5 टक्के कर द्यावा लागणार आहे. 5 ते 7.5 लाख उत्पन्नावर 10 टक्के कर, 7.5 ते 10 लाख वेतन 15 टक्के कर, 10 ते 12 लाख उत्पन्नावर 20 टक्के कर, 12.5 ते 15 लाख पर्यंत 25 टक्के कर आणि 12.5 ते 15 लाख पर्यंत 25 टक्के कर भरावा लागणार आहे.(Budget 2020 Live News Updates: अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार मध्ये निराशा; सेन्सेक्स, निफ्टी गडगडली)

Income Tax (Photo Credit-File Image)
Income Tax (Photo Credit-File Image)

करदात्यांचा त्रास कमी करण्याचं प्रयत्न मोदी सरकार करणार आहे. टॅक्स देणार्‍यांच्या संरक्षणासाठी विशेष कायदा करणार. आता विश्वासार्ह वातावरण निर्माण केले जाणार आहे. टॅक्स पेअर चार्ट बनवला जाणार आहे. आता बॅंकिंग इन्श्युरंस वाढवले जाणार तसेच बॅंकांमधील गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत. आता 1 लाखावरून विमा सुरक्षा 5 लाख करण्यात आली आहे.