Close
Advertisement
  शनिवार, ऑक्टोबर 05, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

Budget 2020 Highlights: अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार मध्ये निराशा; सेन्सेक्स, निफ्टी गडगडली

बातम्या Dipali Nevarekar | Feb 01, 2020 01:34 PM IST
A+
A-
01 Feb, 13:34 (IST)

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार मध्ये निराशा; सेन्सेक्स, निफ्टी गडगडली आहे. सेन्सेक्स 650 अंकांनी कोसळला आहे.

01 Feb, 13:13 (IST)

करदात्यांना टॅक्स भरणं आता सुकर होणार आहे. करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.  

5-7.5 लाख उत्पन्न असणार्‍याला 10% टॅक्स भरावा लागेल. 

7.5 ते 10 लाख उत्पन्न असणार्‍याला 15% टॅक्स भरावा लागेल. 

10 ते  12.5  लाख उत्पन्न असणार्‍याला 20% टॅक्स भरावा लागेल. 

12.5 ते 15  लाख उत्पन्न असणार्‍याला 25% टॅक्स भरावा लागेल. 

दरम्यान 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणार्‍यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र आता नव्या आणि जुन्या टॅक्स सिस्टिमची निवड करणंं हे करदात्यांच्या हातामध्ये असेल.  

01 Feb, 12:57 (IST)

आयडीबीआय बॅंकेतील सरकारी भागिदारी सरदार विकणार आहे. त्यसोबतच एलआयसीमधील मोठा भागदेखील सरकार विकण्याचा विचारात असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. LIC  चा आयपीओ बाजाणारात आणणार . 

01 Feb, 12:44 (IST)

करदात्यांचा त्रास कमी करण्याचं प्रयत्न मोदी सरकार करणार आहे. टॅक्स देणार्‍यांच्या संरक्षणासाठी विशेष कायदा करणार. आता विश्वासार्ह वातावरण निर्माण केले जाणार आहे. टॅक्स पेअर चार्ट बनवला जाणार आहे. आता बॅंकिंग इन्श्युरंस वाढवले जाणार तसेच बॅंकांमधील गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत. आता 1 लाखावरून विमा सुरक्षा 5 लाख करण्यात आली आहे.  

01 Feb, 12:27 (IST)

भारतामध्ये आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये वृद्ध आणि दिव्यांगांसाठी 9500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर एसटी आणि एसटी कल्याण योजनेसाठी 85 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर पर्यटनाच्या विकासासाठी 2हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सांस्कृतिक खात्यासाठी 3150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

01 Feb, 12:20 (IST)

'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेला उत्तम यश आलं आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या शिक्षणातील प्रमाण वाढलं आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून आता मुलींच्या शिक्षण, आरोग्य ते विवाहाच्या बाबतीत सूचना दिल्या जातील. आता बालविवाहाचं प्रमाण कमी झालं आहे. 

01 Feb, 12:07 (IST)

मुंबई- अहमदाबादमधील हायस्पीड ट्रेन आता पर्यटकांचं आकर्षण बनवण्याचं उद्दिष्ट आहे. दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. 550 स्टेशनवर वाय फाय सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. जलमार्गांप्रमणेच हवाई मार्ग सुधारले जातील. तेजस एक्सप्रेस वाढवल्या जाणार आहेत. 

01 Feb, 11:58 (IST)

लवकरच नवं शिक्षण धोरण जाहीर केले जाईल. तसेच वर्षभरासाठी नव्या इंटर्नशिप्स सुरू केल्या जातील. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणच्या कक्षा रूंदावल्या जाणार आहेत. उच्च शिक्षणासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. डिप्लोमासाठी 2021 पर्यंत नव्या संस्था सुरू केल्या जातील. शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटींची गुंतवणूक  केली जाणार आहे.  

01 Feb, 11:49 (IST)

आरोग्य क्षेत्रासाठी 69 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. टीबी हारेगा इंडिया जितेगा असा नारा देत भारतातून क्षयरोग म्हणजेच  TB चा नायनाट करण्याचं उद्दिष्टं आहे. तसेच पीपीपी मॉडेलद्वारा रूग्णालयांची उभारणी केली जाणार आहे. 

01 Feb, 11:39 (IST)

शेतकर्‍यांसाठी बजेट 2020 मध्ये 15 लाख  कोटींच्या कर्जाची तरतूद  करण्यात आली आहे. दरम्यान किनारपट्टीजवळ राहणार्‍यांसाठी सागरमित्र योजना राबवली जाणार आहे. तर मासे उत्पादन 200 लाख टन वाढवण्याचं उद्दिष्ट असेल.

Load More

Union Budget 2020: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) आज मोदी सरकारमधील दुसरा अर्थसंकल्प (Union Budget)  सादर करणार आहेत. आज लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प वाचायला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सध्या कमजोर झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकार  (Modi Sarkar)  नेमक्या काय घोषणा करणारहे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान आज सादर होणार्‍या अर्थसंकल्प 2020 चे सारे अपडेट्स तुम्हांला एका क्लिकवर इथे लाईव्ह पहायला मिळणार आहेत.

दरम्यान रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर मध्ये आता 50 लाख कोटीची गुंतवणूक 2018 ते 2030 मध्ये होणार आहे. तसेच देशातील ग्रामीण आणि शहरी भाग यामधील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 'मेक इन इंडिया' धोरणात चीनच्या नीतीचा अंतर्भाव केल्यास भारताला येत्या पाच वर्षांत चार कोटी नव्या रोजगारांची निर्मिती करता येईल, असा महत्त्वपूर्ण सल्ला यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये देण्यात आला आहे. Economic Survey 2020: भारताचा GDP 2020-21 मध्ये 6 - 6.5% असण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणामध्ये जाहीर

येत्या 2025 पर्यंत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था गाठण्यासाठी पायाभूत सुविधांवर 1.4 लाख डॉलर खर्च करावे लागतील, असा अंदाज यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये नमूद करण्यात आला आहे. बांधून तयार असलेल्या घरांची विक्री करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्राने घरांच्या किंमती कमी करून बँका तसेच गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांची कर्ज चुकवणं अशा सूचना अहवालात करण्यात आल्या आहेत.


Show Full Article Share Now