बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आयकर विभागाकडून सोमवारी (4 जानेवारी 2021) काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांची चौकशी सुरु केली आहे. आयकर विभाग रॉबर्ट वाड्रा यांचा जबाब नोंदवून घेत आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे की, आयकर विभागाचे एक पथक सुखदेव विहार येथील कार्यालयात पोहोचली आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्यावर लंडन येथील ब्रायनस्टन स्क्वायर येथे 19 लाख पाऊंड ( सुमारे 19 कोटी रुपये) किमतीचे घर खरेदी करण्यासाठी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. वाड्रा हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय विभाग विविध आरोपांखाली त्यांची चौकशी करत आहेत.
वाड्रा यांच्या चौकशी आणि जबाब नोंदवून घेण्याबाबत आयकर विभागाने या आधी संकेत दिले होते. रॉबर्ट वाड्रा हे देखील चौकशीला सामरे जाण्यास तयार होते. आयकर विभागाने आधी सकाळी 9.30 वाजताची वेळ दिली होती. परंतू, रॉबर्ट वाड्रा यांनी सकाळी 10.30 पर्यंत सर्व पेपर्स घेऊन तयार राहतील. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाला आपल्या सुखदेव विहार येथील कार्यालयात बोलावले. आयकर विभागाकडून प्रॉपर्टी डिटेल्स आतापर्यंत जारी करण्यता आली नाहीत. सायंकाळी किंवा रात्रीपर्यंत त्याबाबत तपशील मिळेल अशी आशा आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019 : 'रॉबर्ट वाड्रा यांचे सहर्ष स्वागत' मतदारसंघात पोस्टर्स झळकले, राजकीय वर्तुळात खळबळ)
Income Tax Department is recording the statement of Robert Vadra in connection with Benami Property Case: Sources
(file pic) pic.twitter.com/S5T7pVGq8S
— ANI (@ANI) January 4, 2021
दरम्यान, या आधी ईडीने वाड्रा यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान, वाड्रा यांचे वकील ईडीचे दावे फेटाळत म्हटले होते की एजन्सी त्यांना केव्हाही बोलवू शकते. ते जेव्हा बोलवतात तेव्हा वाड्रा चौकशीसाठी हजर राहू शकतात.