अयोद्धेचं राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) येत्या काही महिन्यात भाविकांसाठी खुलं होणार आहे. 2024 च्या मकरसंक्रांती (Makar Snakranti) ला मंदिर खुलं करण्याचा मानस असल्याने या मंदिराचं काम जोरात सुरू आहे. अयोद्धा राम मंदिर ट्रस्ट (Ayodhya Ram Mandir Trust) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या मंदिरात रामाची मूर्ती ही कोदंडधारी (Archer) असणार आहे. तसेच कर्नाटकातून आणलेल्या कृष्णशिळेमधून त्याची निर्मिती होणार आहे. दरम्यान कोणत्या दगडातून मृर्ती घडवली जाईल याचा अंतिम निर्णय मात्र शिल्पकारांचा असणार आहे.
अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये राम लल्ला 5 फूट लांबीचा असेल. म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार Arun Yogiraj कडून राम मूर्ती घडवली जाणार आहे. मंगळवारी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची 2 दिवसीय बैठक पार पडली. यामध्ये मूर्तीच्या स्वरूपाचा अंतिम निर्णय घेण्यात आला. 'रामाची नवी मूर्ती ही भगवान श्रीराम 5 वर्षांचे असतानाच्या रूपात असणार आहे. ज्याची उंची 5 फूट असेल. उभी मूर्ती असेल ज्यामध्ये हातात धनुष्यबाण असेल.' असे ट्रस्टचे सदस्य Swami Teerth Prasannyacharya यांनी मीडीयाशी बोलताना सांगितले आहे. Ayodhya Ram Mandir: अयोद्धेच्या राम मंदिरात भगवान श्रीराम आणि सीता माईची मूर्ती कोणत्या दगडापासून बनणार याचा अंतिम फैसला मूर्ती घडवण्याच्या कामाचे प्रमुख घेतील; Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra चे General Secretary Champat Rai .
दरम्यान शिल्पकार अरूण योगराक यांच्यासाठी कर्नाटक मधील करकर आणि हेग्गेदेवेनकोटे या गावातून आणण्यात आले आहेत. पण कोणत्या शिळेतून मूर्ती घडणार याचा अंतिम निर्णय शिल्पकारांवर सोडला आहे.
रामभक्तांमध्ये सध्या मंदिर उभारणीबाबत उत्सुकता आहे. मंदिरात देवतांची प्राणप्रतिष्ठा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर करण्याचा सध्या मानस आहे. या मंदिराचे भूमिपूजन 2 ऑगस्ट 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.
न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या सर्वात जुन्या खटल्याचा अंतिम निकाल सुप्रिम कोर्टाने दिल्यानंतर अखेर अयोद्धेमध्ये राम मंदिर उभारणीला सुरूवात झाली आहे.