प्रतिकात्मक फोटो (File Photo)

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी 61 जागांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आर्थिक वर्ष 2019-20 वर्षासाठी स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरसाठी एक अधिसूचना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर झळकवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असल्यास idbibank.in येथे अधिक माहिती देण्यात आली आहे.

या नोकर भरतीसाठी DGM (ग्रेड D), AGM (ग्रेड सी), मॅनेजर (ग्रेड बी) या रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आयडीबीआय बँक स्पेशालिस्ट ऑफिर पदासाठी अर्ज प्रक्रिया 28 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. तसेच 12 डिसेंबर 2019 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज आणि शुल्क भरावे लागणार आहेत.

अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला आयडीबीआयच्या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. त्यानंतर तेथे गेल्यावर उमेदवाराने युजर्सआयडीसाठी रजिस्ट्रेशन करावे. लॉगिन केल्यावर अर्ज येईल तेथे उमेदवाराला त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. तसेच शुल्काची फी डेबिच किंवा क्रेडिट कार्डने भरु शकता.

तसेच भारतीय रेल्वेत नोकरीची संधी उपलब्ध झाली असून त्याअंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. दक्षिण भारतीय रेल्वेत रिक्त जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून त्यांना अर्ज या scr.indianrailways.gov.in  संकेतस्थळावर जाऊन भरावा लागणार आहे. या नोकरभरीमध्ये स्पोर्ट्स कोटा मध्ये नोकर भरती करण्यात येणार असून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे.