Coronavirus (Photo Credits: PTI)

केंद्रीय आरोग्यमंंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan)  यांंनी भारतातील कोरोना परिस्थितीविषयीचे(Coronavirus Update)  अपडेट दिले आहेत. काही दिवसांंपुर्वी आयसीएमआर (ICMR) तर्फे दुसरा सिरो सर्व्हे (Sero Survey) घेण्यात आला होता यात समोर आलेल्या माहितीनुसार भारतीयांंमध्ये अजुनही कोरोनापासुन वाचण्यासाठी आवश्यक असणारी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झालेली नाही परिणामी आपल्याला कोविड 19 काळात दिलेल्या खबरदारीच्या सुचनांंचे पालन करणे अजुन काही दिवसांंसाठी तरी आवश्यक असणार आहे. असेही डॉ.हर्षवर्धन यांंनी म्हंंटले आहे. याशिवाय ICMR तर्फे कोरोनाची पुन्हा लागण होण्याबाबत आणि Remdesivir व प्लाज्मा थेरपी (Plasma Therapy)  बाबत सुद्धा विशेष माहिती दिली आहे, याबाबत सविस्तर जाणुन घ्या. COVID-19 Diagnosis Update: कोविड-19 च्या अचूक निदानासाठी Equine Biotech कंपनीने तयार केले 'GlobalTM Diagnostic Kit'

डॉ.हर्षवर्धन यांंच्या माहितीनुसार, सध्या आयसीएमआर हे कोरोनाची दुसर्‍यांंदा लागण होण्याबाबत तपास करत आहे. सुदैवाने अजुन तरी पुन्हा लागण होण्याची प्रकरणे ही अगदी कमी आहेत. सरकार याही परिस्थितीकडे पुर्णतः लक्ष देऊन आहे. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे, कोरोनावरील लस सापडली नसताना उपचाराचा मार्ग म्हणुन अनेक वैद्यकीय तज्ञ Remdesivir आणि प्लाझ्मा थेरपी वापरण्यावर भर दिला जातोय मात्र सरकारतर्फे खाजगी तसेच सरकारी हॉस्पिटल ना हा वापर कमी केला जावा अशा सुचना दिल्या जात आहेत.

ANI ट्विट

(कोविड-19 'Gargle and Spit' टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या चाचणीच्या या पद्धतीबद्दल सविस्तर)

दरम्यान भारतात कोरोनाची स्थिती पाहता आता देशात एकुण आकडा 5,992,533 वर पोहचला आहे. मागील 24 तासांत 88,600 नव्या रुग्णांची भर पडली आहे, सद्य घडीला 9,56,402 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून 49,41,628 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 94,503 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.