देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गात कोविड-19 (Covid-19) चे अचूक निदान करण्यासाठी Equine Biotech कंपनीने 'GlobalTM Diagnostic Kit' विकसित केले आहे. इंडियन इंस्टीट्यूड ऑफ सायन्सने (Indian Institute of Science) ही माहिती दिली आहे. हे RT-PCR Diagnostic Kit असून याद्वारे कोविड-19 संसर्गाचे अचूक निदान होणे शक्य आहे. तसंच याद्वारे टेस्ट करणे खर्चिक नाही. Equine Biotech बंगळुरु येथील IISc येथील कंपनी आहे. (कोविड-19 'Gargle and Spit' टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या चाचणीच्या या पद्धतीबद्दल सविस्तर)
इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्सने ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, Equine Biotech कंपनीने कोविड-19 च्या अचूक आणि स्वस्त चाचणीसाठी RT-PCR Diagnostic Kit विकसित केले आहे. याला 'GlobalTM diagnostic kit' असे नाव देण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) या किटला कोविड-19 ची चाचणी करण्यासाठी मान्यता दिली आहे. रुग्णाच्या सॅपलमध्ये कोविड-19 आहे की नाही याचा हे या किटद्वारे केवळ 1.5 तासात समजते, असेही इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्सने म्हटले आहे.
ANI Tweet:
It has been approved for use in authorised COVID-19 diagnostic labs by the Indian Council of Medical Research (ICMR). The test takes about 1.5 hours to confirm the presence of SARS-CoV-2 in patient samples: Indian Institute of Science https://t.co/87GbckzJGj
— ANI (@ANI) September 26, 2020
देशातील कोरोना बाधितांचा आकडा 59,03,933 वर पोहचला आहे. तर मृतांची संख्या 93,379 इतकी झाली आहे. सध्या 9,60,969 सक्रीय रुग्ण असून 48,49,585 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने कोविड-19 वरील लसीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या Ad26.COV2.S लसीचे पहिल्या टप्प्यातील परिणाम सकारात्मक आले आहेत. तर ऑक्सफर्ड-सीरम इंस्टीट्युटच्या कोविशिल्ड लसी देखील विकासाच्या टप्प्यात आहे. आज या लसीचे तीन डोस मुंबईतील केईएम रुग्णालयात तीन जणांना देण्यात आले.