(Photo Credit - File Photo)

आयसीएमआर ( Indian Council of Medical Research) कडून कोविड 19 चा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन चं निदान अवघ्या 2 तासांत करण्यासाठी एका नव्या टेस्टिंग कीटचा शोध लावला आहे. हे टेस्टिंग किट आयसीएमआर च्या नॉर्थ ईस्ट भागातील टीमच्या संशोधकांनी समोर आणलं आहे. Dr Biswajyoti Borkakoty यांनी त्याचं नेतृत्त्व केलेले आहे.

ICMR-RMRC, Dibrugarh, यांनी बनवलेल्या या टेस्टिंग कीट मध्ये कोविड 19 चा नवा व्हेरिएंट (B.1.1.529)हा ओमिक्रॉन दोन तासांमध्ये टेस्ट करता येतो. सध्या जिनोम सिक्वेंसिंग द्वारा ओमिक्रॉनचं निदान केले जात आहे. ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्याच्या तुलनेत आता बाजारात आलेली ही नवी कीट बराच वेळ वाचवू शकणार आहे सोबतच निदान लवकर झाल्याने संसर्ग रोखण्यास मदत होऊ शकते. सध्या रूग्णांच्या चाचणी नंतर 4-5 दिवसांनी त्यांचा ओमिक्रॉन बाबतचा निकाल येत आहे.

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप मॉडेल द्वारा पश्चिम बंगालच्या GCC Biotech या कंपनीद्वारा मोठ्या प्रमाणात हे कीट बनवले जाणार आहेत. नक्की वाचा: Omicron FAQs: कोविड विषाणूचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'मुळे वाढल्या चिंता; जाणून घ्या या नव्या प्रकाराबद्दल सर्वकाही .

सध्या भारतामध्ये सर्वाधिक ओमिक्रॉनग्रस्त रूग्ण महाराष्ट्रामध्ये आहे. सोबतच गुजरात, चंदिगड, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली मध्ये ओमिक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ओमायक्रॉन या सार्स- कोव्ह-2 (SARS-CoV-2) चा नवा प्रकार असून, दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचे अस्तित्व पहिल्यांदा आढळले. या प्रकारच्या विषाणूचे म्युटेशन्स म्हणजेच, उत्परीवर्तन अत्यंत जलद गतीने होते असल्याचे आढळले आहे.विशेषतः कोरोना विषाणूच्या सभोवताल जे व्हायरल स्पाईक प्रोटीनचे काटेरी आवरण असते, त्यात या प्रकारच्या विषाणूमध्ये 30 पेक्षा अधिक उत्परीवर्तन झालेले आढळले आहे,आपल्या रोगप्रतिकरक शक्तिकडून विषाणू शरीरात आल्यावर त्याला प्रतिसाद देणारे हे महत्वाचे घटक असतात.

ओमायक्रॉन मध्ये होणाऱ्या या उत्परिवर्तनाचे एकूण संकलन बघता , जे याआधी, वाढत्या संसर्गाशी आणि/किंवा आपल्या रोगप्रतिकारक शक्तिला चकवा देऊ शकेल, असे वाटत असून दक्षिण आफ्रिकेत, कोविड रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ लक्षात घेऊन, जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन हा कोरोनाचा व्हेरीएन्ट ‘काळजीचे कारण’ (VoC) असल्याचे जाहीर केले आहे