'मी पुरुषांसोबत झोपत नाही' कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांचे अजब वक्तव्य
Karnataka Speaker Ramesh Kumar | (Photo Credits: IANS)

कर्नाटक विधानसभा अध्यक्ष के आर रमेश कुमार (Karnataka Speaker Ramesh Kumar) हे सध्या त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरले आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते के एच मुनियप्पा (K H Muniyappa) यांच्यासोबतच्या संबंधांबाबत रमेश कुमार यांना गुरुवारी विचारण्यात आले होते. त्यावर रमेश यांनी 'मी पुरुषांसोब झोपत नाही' ("I Don't Sleep With Men") असे म्हटले होते. 15 फेब्रुवारी रोजी मुनियप्पा यांनी म्हटले होते की, रमेश कुमार आणि मी पती-पत्नींप्रमाणे आहोत. आमच्यात कोणताही वाद नाही. त्यानंतर अध्यक्षांच्या या विधानाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

रमेश कुमार यांनी आपल्या जुन्या विधानावर प्रदीर्घ काळानंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'मी पुरुषांसोबत झोपत नाही. खरेतर मी कोणासोबतच झोपत नाही. माझी एकच पत्नी आहे. आम्ही दहा वर्षांपासून विवाहीत आहोत. मुनियप्पा यांना माझ्यासोबत झोपन्यात रुची असू शकते. मला मात्र, त्यात मुळीच रुची नाही. माझा कोणासोबतच कोणताही संबंध नाही.' (हेही वाचा, व्हिडिओ: प्रियंका गांधी 'पप्पू की पप्पी'; केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांचे वादग्रस्त वक्तव्य)

दरम्यान, मुनियप्पा यांना कोलार लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे निवडणूक तिकीट मिळू नये यासाठीच रमेश कुमार अशी वक्तव्य करुन मुनियप्पा यांच्यावर टीकास्त्र सोडत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दुसऱ्या बाजूला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी रमेश कुमार आणि मुनियप्पा यांच्यात कोणताही वाद नसल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोलार लोकसभा मतदारसंगातून सर्वच्या सर्व पाच आमदारांनी पक्षनेतृत्वावर तिकीटासाठी दबाव टाकला होता की, कोणत्याही स्थितीत मुनियप्पा यांना तिकीट दिले जाऊ नये. मतदारसंघातील सर्वच आमदार विरोधात असल्यामुळे मुनियप्पा चिंतेत आहेत की, या विरोधामुळे आपले तिकीट तर कापले जाणार नाही ना?

एएनआय ट्विट

दरम्यान, कार्यकर्त्यांना वाटते की पक्षाकडे मुनियप्पा यांच्याशिवाय कोणताच पर्याय सध्यातरी नाही. त्यामुळे पक्षाचे लोकसभा तिकीट हे मुनियप्पा यांनाच मिळेन.