मॉडेलच्या प्रेमात आंधळे झालेल्या पतीने केली पत्नीची हत्या
मंजीत आणि मॉडेल एजेल गुप्ता (Photo Credits: ANI)

दिल्लीतील बवानामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंजीत नावाच्या एका व्यक्तीने मॉडेलच्या प्रेमात आंधळे होऊन आपल्या पत्नीचा सुनीताचा खून केला आहे. या घटनेने बवाना परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, मंजीतचे नवोदीत अभिनेत्री, मॉडेल एजेल गुप्तसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे पत्नीला आपल्या प्रेमाच्या वाटेतून दूर करण्यासाठी त्याने गर्लफ्रेंडच्या मदतीने पत्नी सुनिताची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मंजीतने एजेलसोबत विवाह केला होता. मात्र हे नाते त्याला पत्नीपासून लपवायचे होते. त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.  मंजीत आणि एजेल यांची भेट गुरुग्राम येथील एका हॉटेलमधील पार्टीत झाली.

न्यूज एजेंसी एएनआयने ट्वीट करत या घटनेची माहिती दिली. त्याचबरोबर मॉडल एजेल आणि मंजील सिंगचे फोटोजही शेअर केले आहेत.

एजेलने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसोबत काम केले असून शक्ती कपूरसोबतचे तिचे आयटम सॉन्ग चर्चेत आले होते.